सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसची सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद लुडबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत वाढत्या महागाई विरोधात ११ आॅक्टोबरला जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.या सभेला प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस जिल्हा प्रभारी आदित्य सवळेकर व रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री गोटे, मालवण-कुडाळ विधानसभा युवक अध्यक्ष लीलाधर कवटकर, शहर अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, सचिन जैतापकर, नितीन मालवणकर, गोपाळ वराडे, प्रमोद धामापुरकर, सचिन सावंत, दिलीप तळगावकर, मेघश्याम लुडबे आदी उपस्थित होते.महात्मा गांधी जयंती स्वच्छता पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यात वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे असेही यावेळी ठरविण्यात आले. यावेळी युवक कार्यकारिणीचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्ग : महागाई विरोधात जिल्हा युवक काँग्रेस छेडणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 17:10 IST
सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसची सभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद लुडबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत वाढत्या महागाई विरोधात ११ आॅक्टोबरला जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.
सिंधुदुर्ग : महागाई विरोधात जिल्हा युवक काँग्रेस छेडणार आंदोलन
ठळक मुद्देमहागाई विरोधात जिल्हा युवक काँग्रेस छेडणार आंदोलन११ आॅक्टोबरला जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी आंदोलन