Sindhudurg: शेकरू संवर्धनासाठी डॉ. रुपेश पाटकरांचा अनोखा पुढाकार, आठ एकर बागच राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केली
By अनंत खं.जाधव | Updated: December 14, 2024 16:57 IST2024-12-14T16:53:20+5:302024-12-14T16:57:31+5:30
अनंत जाधव सावंतवाडी : महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर असलेल्या बांदा गावातील गवळी टेंब येथे माणसपोचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी ...

Sindhudurg: शेकरू संवर्धनासाठी डॉ. रुपेश पाटकरांचा अनोखा पुढाकार, आठ एकर बागच राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केली
अनंत जाधव
सावंतवाडी : महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर असलेल्या बांदा गावातील गवळी टेंब येथे माणसपोचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी आपल्या आठ एकर बागायतीत शेकरू संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. गेली पाच ते सहा वर्षे ते शेकरूंच्या संरक्षणासाठी काम करत असून डॉ. पाटकर यांनी आपली बागच शेकरूसंवर्धनासाठी राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
डॉ.पाटकर यांनी ही मोहीम हाती घेण्या मागे प्राणी आणि माणूस यांच्यातील संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्याना सुरक्षित जीवन जगता आले पाहिजे हाच आपला उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे. उच्च शिक्षित आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानसोपचार तज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले रूपेश पाटकर यांनी आपल्या बांदा गवळीटेंब येथील आठ एकर बागेत शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
शेकरू हा तसा जगलक्षेत्रात आढळणारा प्राणी पण आता शेकरू जंगलात कमी जंगलाच्या बाजूच्या बागायतीत जास्त आढळून येतात उंच उंच नारळ सुपारीच्या बागा या शेकरू च्या आवडीचे ठिकाण पण शेकरू जसजसा मनुष्य वस्तीत येऊ लागला तसतसे शिकारीचे प्रमाण ही वाढू लागले.
त्यातूनच डॉ.पाटकर यांना ही अनोखी कल्पना सुचली त्यांनी आपल्या आठ एकर बागेत नारळ सुपारीची उंच उंच झाडे असल्याने मोठ्याप्रमाणात शेकरू चे वास्तव्य असल्याचे त्याच्या निदर्शनास आले या प्राण्यांचे शिकारयापासून संरक्षण झाले पाहिजे या उद्देशाने त्यांनी बागेच्या गेट वरच शेकरू राखीव क्षेत्र म्हणून फलक लावला आहे.
तसेच शेकरूची हत्या केल्यास भारतीय वन्यजीव कायद्यान्वये शिक्षा होऊ शकते.असे ही या फलकावर म्हटले आहे. डॉ.पाटकर याच्या या अनोख्या कल्पनेचे सर्वच थरातून कौतुक होत आहे. समृध्द जंगलाचे प्रतिक असलेला शेकरू ला जंगलाचा राजा च म्हणतात पण सध्या हा राजाच शिकारीच्या वक्रदृष्टी अडचणीत आला असून डॉ.पाटकर याच्या अनोख्या उपक्रमांमुळे त्याला थोडसे संरक्षण एवढे मात्र निश्चित म्हणावे लागणार आहे.
आपणास ही कल्पना सुचण्यामागे काही शिकारी बंदुका घेऊन अशा प्राण्याची शिकार करताना मी बघितले मला ते सहन झाले नाही. जर आपण मनुष्य व प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करायचा झाला तर शेकरू सारख्या अनेक प्राण्यांचे संरक्षण हे केलेच पाहिजे त्यामुळे मी शेकरू राखीव क्षेत्र म्हणून फलक माझ्या बागेत लावल्याने त्याचे जीवन तरी सुखकारक झाले हे बघून बरे वाटते. - डॉ.रूपेश पाटकर, मानसोपचार तज्ञ, बांदा