शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : जानवली नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 16:29 IST

कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील स्मशानभूमीनजीक जानवली नदीपात्रातील पाण्यात बुडून विजय कन्नान (२३) या युवकाचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देजानवली नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यूघटनास्थळी पंचनामा, पोलीस करीत आहेत अधिक तपास

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील स्मशानभूमीनजीक जानवली नदीपात्रातील पाण्यात बुडून विजय कन्नान (२३) या युवकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तामिळनाडू राज्यातील मूळ रहिवासी असलेला विजय कन्नान हा युवक आपल्या सहकाऱ्यांसह कलमठ बिडयेवाडी येथे भाड्याच्या घरात रहात होता. तसेच हळवल येथे कार्यालय असलेल्या ग्लेझ इंडिया प्रा. लि. या कंपनीत तो काम करीत होता.

गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तो जानवली नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही घटना काही ग्रामस्थांनी पाहिली. त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे आणखीन काही ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले.

कणकवली पोलीस ठाण्यात या घटनेबाबत कळविण्यात आले. त्यांनी तहसील कार्यालयातील आपत्कालीन कक्षाला माहिती दिली. त्यानंतर नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच इतर महसूल विभागाचे कर्मचारी लाईफ जॅकेट, दोरखंड असे साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.कलमठ येथील सामाजिक कार्यकर्ते बाबू आचरेकर यांनाही बोलाविण्यात आले. अथक प्रयत्नानंतर इतर ग्रामस्थांच्या मदतीने बाबू आचरेकर यांनी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विजय कन्नान याला पाण्याबाहेर काढले.कलमठ कलेश्वर मंदिराजवळील कोंडीत तो त्यांना आढळून आला. पाण्याबाहेर काढल्यानंतर विजय हा मृत झाला असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण व हवालदार जीवन कुडाळकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस