पोलीसांच्या भितीने कर्नाटकातील युवकाचा भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:18 PM2018-07-17T16:18:06+5:302018-07-17T16:18:55+5:30

Due to police fear, the youth of Karna drowned in the water of the Bhima river | पोलीसांच्या भितीने कर्नाटकातील युवकाचा भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

पोलीसांच्या भितीने कर्नाटकातील युवकाचा भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

googlenewsNext

सोलापूर : अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलीसाच्या पथकाच्या भितीने कर्नाटकातील एका युवकाची भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली़ 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील भीमा नदीच्या पात्रात कर्नाटकातील सातलगावचा तरुण श्रीशैल हणमंतराव विरशेट्टी (वय २०) याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. याबाबतची फिर्याद मयताचे काका लक्ष्मण तुकाराम विरशेट्टी यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात दिली आहे़  

या घटनेची माहिती अशी की, श्रीशैल विरशेट्टी हा तेलगांव येथील भीमा नदीच्या पात्रातील बेकायदा वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरवर मुनीम म्हणून काम करीत असताना अचानक पोलीस आल्याचे कळताच त्याने भीमा नदीत उडी घेतली़ पोहता येत नसल्याने त्याच्या पाण्यात बुडून मृत्यु झाला़ या घटनेचा तपास पोकॉ बापु दुबे हे करीत आहेत़

Web Title: Due to police fear, the youth of Karna drowned in the water of the Bhima river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.