शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सिंधुदुर्ग : कॉंग्रेसने कार्यकारी अभियंत्यांचे रस्त्याच्या दुर्दशेकडे वेधले लक्ष, काम न झाल्यास तीव्र आंदोलन, निवेदनादवारे दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:18 PM

कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते आचऱ्यापर्यन्त जाणाऱ्या राज्यमार्गाची पूर्ण चाळण झाली आहे. हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत न आणल्यास रास्ता रोको तसेच अधिकाऱ्यांना घेराव असे आंदोलनात्मक पर्याय अवलंबले जातील. असा इशारा निवेदनाद्वारे कणकवली तालुका कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांना मंगळवारी कार्यालयात भेट घेवून दिला.

ठळक मुद्देकॉंग्रेसने कार्यकारी अभियंत्यांचे रस्त्याच्या दुर्दशेकडे वेधले लक्षकाम न झाल्यास तीव्र आंदोलननिवेदनादवारे दिला इशारा

कणकवली : कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते आचऱ्यापर्यन्त जाणाऱ्या राज्यमार्गाची पूर्ण चाळण झाली आहे . हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत न आणल्यास रास्ता रोको तसेच अधिकाऱ्यांना घेराव असे आंदोलनात्मक पर्याय अवलंबले जातील. असा इशारा निवेदनाद्वारे कणकवली तालुका कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांना मंगळवारी कार्यालयात भेट घेवून दिला.या निवेदनात म्हंटले आहे कि , कणकवली आचारा रस्त्याबाबत या भागातील राजकीय पक्षांनी आपल्या परीने निवेदने देवून तसेच आंदोलने करून रस्त्याची सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली. काँग्रेसने हि वृक्षारोपण सारखे आंदोलन छेडले . त्यावेळी आपल्याकडून रस्ता सुस्थितीत आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते . मात्र मलमपट्टी वगळता दुरुस्तीबाबत आपल्याकडून काहीच हालचाल केली गेलेली नाही.

 या रस्त्यावरील उखडलेल्या खडीमुळे अनेक अपघात होत आहेत . यातच चार दिवसापूर्वी एक महिला याच रस्त्यावरून चालत असताना बाजूने जाणाऱ्या डंपरच्या टायर खाली दगड येऊन तो त्या पादचारी महिलेच्या पायावर बसून ती जायबंद झाली आहे.

कणकवली आचरा रस्त्यासंदर्भात प्रदीप व्हटकर यांना काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले . यावेळी महेंद्र सावंत, आतिष जेठे , विलास कोरगावकर , निखिल गोवेकर , विशाल हर्णे , लीलाधर बांदेकर आदी उपस्थित होते.

यामुळे संबधित रस्ता त्वरित दुरुस्त करणार कि अपघात व जखमी प्रवासी पहात बसणार असा सवाल या निवेदनातून करण्यात आला आहे. हा रस्ता लवकर सुस्थितीत न आल्यास आंदोलन करण्यात येणार असून यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी त्याला आपणच जबाबदार असाल. असेहि या निवेदनात म्हंटले आहे.यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रस्ता सुस्थितीत करण्याचे लेखी पत्र देण्याची मागणी प्रदीप व्हटकर यांच्याकडे केली.जोपर्यंत लेखी आश्वसन मिळत नाहि, तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा या शिष्टमंडळाने घेतला.

त्यानंतर व्हटकर यांनी या रस्त्यासंदर्भात १९ जानेवारीला निविदा उघडण्यात येणार आहे. तदनंतर आवश्यक ती प्रक्रीया होऊन पात्र मक्तेदारास कामाचे आदेश लवकरात लवकर देण्याची कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत ,उपतालुकाध्यक्ष आतिष जेठे ,शहराध्यक्ष विलास कोरगावकर , निखिल गोवेकर, विशाल हर्णे , लीलाधर बांदेकर , प्रवीण वरुणकर ,चंद्रकांत पवार , दिव्या साळगावकर , शिंदे,  महेश कोदे , निलेश मालंडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcongressकाँग्रेस