शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला वेंगुर्लेत कचरा डेपोमध्ये भोजनाचा आस्वाद, स्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 5:42 PM

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज वेंगुर्ले कचरा डेपोला भेट दिली. येथील स्वच्छते बाबत विविध प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ज्या ठिकाणी पूर्वी दुर्घंधिने नाक दाबावे लागे त्याच ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी जेवणाचा उपक्रमांचे कौतुक करत आस्वाद घेतला.

ठळक मुद्देचक्क कचरा डेपोमध्ये जेवणाचा आस्वाद घेतलास्वच्छतेबाबत राबवित असलेल्या उपक्रमांचे केले जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज वेंगुर्ले कचरा डेपोला भेट दिली. येथील स्वच्छते बाबत विविध प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ज्या ठिकाणी पूर्वी दुर्घंधिने नाक दाबावे लागे त्याच ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी जेवणाचा उपक्रमांचे कौतुक करत आस्वाद घेतला.

वेंगुर्लेत कचऱ्याचे वर्गीकरण केल्यामुळे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ होत आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क कचरा डेपोमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. शहरवासीय स्वच्छतेबाबत राबवित असलेल्या उपक्रमांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

१२ हजार लोकसंख्या असलेल्या वेंगुर्ले शहरावर देशाचे लक्ष असून शहरात स्वच्छ सर्वेक्षण घडामोडीत लक्षणीय वाढ होत आहे. जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबतीत  वेंगुर्ले नेहमीच  आघाडीवर असून ज्या पद्धतीने वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिक एकत्र येवून काम करत आहेत. त्यामुळे विकासाबरोबर स्वच्छ्ता अभियानात प्रथम क्रमांक मिळविला हेच सातत्य कायम राहिल्यास देशातही अव्वल ठरू शकतो असे उदगार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काढले.वेंगुर्ले नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वच्छ्तेचा वेंगुर्ले  पॅटन चित्रफित दाखवण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध गोष्टीचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले कोकणी माणूस सुरुवातीला कोणतीही गोष्ट आचरणात आणतो व नंतरच कृतीत करतो. सचिन तेंडुलकर हा एकच असतो त्याच्या प्रमानेच आपण स्वच्छतेत एकच नंबर असलो पाहिजे.

विकास कामासाठी निधीची कमतरता नसून चांगल्या कामासाठी शासनाकडून निधी नेहमीच मिळतो.आपण काम जास्त करतो पण त्याचे कागदोपत्री सादरीकरण कमी दाखवतो. आपण वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.

      स्वच्छ सर्वेक्षण आढावा २०१८कार्यक्रमाला सकाळी स्वच्छता फेरीने सुरुवात झाली. या फेरीत जिल्हाधिकारी उदय चौधरी,  जिल्हा प्रशासक संतोष  जिरगे,  नगराध्यक्ष राजन गिरप तहसीलदार शरद गोसावी मुख्याधिकारी वैभव साबळे सह उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे , प्रकाश डिचोलकर, तुषार सापळे,धर्मराज कांबळी, संदेश निकम,नागेश गावडे,शैलेश गावडे, सुमन निकम, पूनम जाधव, कृपा गिरप, स्नेहा खोबरेकर, कृतिका कुबल, शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, नगरपरिषद प्रशासक अधिकारी ,कर्मचारी ,शाळांचे शिक्षक व विद्यार्थी  मोठ्या संख्येने झाले होते. 

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदारSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान