स्वयंसेवक स्वच्छ भारत अभियानासाठी समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:18 PM2018-01-11T22:18:38+5:302018-01-11T22:18:48+5:30

देशातील युवकांचे वाढते प्रमाण हे देशासाठी बलस्थान आहे. या युवाशक्तीला रचनात्मक कार्याकडे वळविण्याचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहे.

Volunteer dedicated to Swachh Bharat Abhiyan | स्वयंसेवक स्वच्छ भारत अभियानासाठी समर्पित

स्वयंसेवक स्वच्छ भारत अभियानासाठी समर्पित

Next
ठळक मुद्देसचिन सांडभोर : घिवारी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशातील युवकांचे वाढते प्रमाण हे देशासाठी बलस्थान आहे. या युवाशक्तीला रचनात्मक कार्याकडे वळविण्याचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहे. रासेयो स्वयंसेवक हे स्वच्छ भारत अभियानासाठी सदैव समर्पित असल्याचे प्रतिपादन रावणवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन सांडभोर यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठअंतर्गत ग्राम घिवारी येथे आयोजीत नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील विद्यापीठ पुरस्कार प्राप्त रासेयो शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. रजनी चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात आयोजीत शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समन्वयक प्रा.बबन मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाहूतक नियंत्रण शाखेचे निरीक्षक संजय सिंह, सरपंच राजेश कटरे, सोनपुरी सरपंच राखी ठाकरे, एड.योगेश अग्रवाल, माहिती व शिक्षणतज्ज्ञ अतुल गजभिये, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ मुकेश त्रिपाठी, उपसरपंच सुनिता नागपुरे, शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश मस्के, पोलीस पाटील राजकुमार गेडाम उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच कटरे यांनी, नागरिकांना घिवारी गाव गोदरीमुक्त गाव करुन स्वच्छता अभियानात रासेयो स्वयंसेवकांसोबत कार्य करण्याचे आवाहन केले. गजभिये यांनी, राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे मनोरंजनाचे साधन नसून गावकºयांमध्ये गावविकासाचे उत्कृष्ट माध्यम आहे, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा. मेश्राम यांनी, स्वच्छता अभियानास राष्ट्रीय कार्य म्हणून नागरिकांनी स्वप्रेरणेने कार्य करण्याचे आवाहन केले.
संचालन रासेयो सहाय्यक डॉ. संजय जगने यांनी केले. प्रास्ताविक शिबिर प्रमुख रवि रहांगडाले यांनी मांडले. आभार रासेयो महिला प्रतिनिधी प्रा.आशा बघेल यांनी मानले. कार्यक्रमासाठी निशांत मेश्राम, जागृत सेलोकर, आकाश नागपुरे, निकीता गाडेकर, राखी पटले, पूजा उके, वैभव शहारे, गोपाल शर्मा, निशांत वहाने, अक्षय चव्हाण, रमेश बहेटवार, समीर गडपायले, रजत तुरकर, योगेश खोब्रागडे, विठ्ठल हरिणखेडे, प्रतिक सोनेवाने, बादल पाटील यांच्यासह रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Web Title: Volunteer dedicated to Swachh Bharat Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.