सिंधुदुर्ग : मालवण एसटी आगारात ७० वा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:39 IST2018-06-02T15:39:30+5:302018-06-02T15:39:30+5:30

रस्ता तिथे एसटी असे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीने आपले ब्रीदवाक्य खरे ठरवले आहे. सत्तर वर्षांची दीर्घकाळ सेवा देणे खूपच आव्हानात्मक गोष्ट आहे. आपल्या निरंतर सेवेतून एसटीने प्रवाशांचा विश्वास प्राप्त केला आहे. म्हणूनच एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांनी केले.

Sindhudurg: Celebration of 70th anniversary of Malvan ST Agaar | सिंधुदुर्ग : मालवण एसटी आगारात ७० वा वर्धापन दिन साजरा

सिंधुदुर्ग : मालवण एसटी आगारात ७० वा वर्धापन दिन साजरा

ठळक मुद्देमालवण एसटी आगारात ७० वा वर्धापन दिन साजरानिरंतर सेवेतून एसटीने विश्वास प्राप्त केला : डॉ. सुभाष दिघे

मालवण :रस्ता तिथे एसटी असे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीने आपले ब्रीदवाक्य खरे ठरवले आहे. सत्तर वर्षांची दीर्घकाळ सेवा देणे खूपच आव्हानात्मक गोष्ट आहे. आपल्या निरंतर सेवेतून एसटीने प्रवाशांचा विश्वास प्राप्त केला आहे. म्हणूनच एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांनी केले.

मालवण एसटी बस स्थानकात एसटीचा ७० वा वर्धापनदिन ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सुभाष दिघे हे बोलत होते. यावेळी एसटीचे उपयंत्र अभियंता ए. एस. मांगलेकर, आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर, ए. एस. निव्हेकर, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर, अ. ना. ओटवणेकर, विनायक चव्हाण, प्रसाद करंदीकर, सुभाष पाटकर, काका खोत, बाळा मालंडकर, जयसिंग कुबल, डी. एम. हिंदळेकर, प्रविण शिंदे, शेखर वाईरकर, प्रसाद बांदेकर, अमित शंकरदास आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवण- मुंबई शिवशाही बस फेरीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून त्याबाबत लवकरच कार्यवाही होईल. प्रवाशांच्या सूचना लक्षात घेऊन यापुढेही आवश्यक त्या सुधारणा व बदल करण्यात येतील असेही मांगलेकर म्हणाले.

यावेळी बाळकृष्ण माणगावकर, नंदकिशोर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. बसस्थानक परिसरात रांगोळी रेखाटणाऱ्या सुभाष पाटकर यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रसाद करंदीकर यांनी केले.

प्रवाशांना चांगली सेवा

प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन नेहमीच तत्पर असते. प्रवाशांसाठी विविध सवलतीच्या योजनाही एसटी राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून नव्याने सुरू झालेल्या शिवशाही गाडीत ज्येष्ठ नागरिकांना गाडीच्या दोन प्रकारांमध्ये ४५ टक्के व ३० टक्के अशी सवलत देण्यात येणार आहे. याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा. असेही एसटीचे उपयंत्र अभियंता मांगलेकर म्हणाले,

Web Title: Sindhudurg: Celebration of 70th anniversary of Malvan ST Agaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.