शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : नाडणमधील कॉजवे पाण्याखाली, अमावास्येची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 15:20 IST

अमावास्येच्या महाकाय भरतीमुळे किनारपट्टी भागामध्ये पाण्याचे प्रमाण वाढत असून या भरतीमुळे नाडण वीरवाडी खाडीवरील कॉजवे पाण्याखाली जात आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक भरती कालावधीमध्ये बंद होत आहे.

ठळक मुद्देनाडणमधील कॉजवे पाण्याखाली, अमावास्येची भरती, किनारपट्टी भागात पाण्याचे प्रमाण वाढले

देवगड : अमावास्येच्या महाकाय भरतीमुळे किनारपट्टी भागामध्ये पाण्याचे प्रमाण वाढत असून या भरतीमुळे नाडण वीरवाडी खाडीवरील कॉजवे पाण्याखाली जात आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक भरती कालावधीमध्ये बंद होत आहे.

याबाबत वीरवाडी येथील ग्रामस्थांनी मेरीटाईम बोर्डाकडे बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणी केली होती. मात्र, मेरीटाईम बोर्डाने याबाबत पतन विभागाकडे बोट दाखविल्याने कॉजवेची उंची वाढविण्याचा प्रश्न जैसे थे राहिला आहे.अमावास्येचा महाकाय भरतीचा वाढलेल्या पाण्याचा फटका किनारपट्टी भागाला बसत असून खाडीकिनारपट्टीलगत जाणारा वीरवाडी रस्त्याचा काही भागही पाण्याखाली जात आहे.

वीरवाडी रस्त्यावरील कॉजवेदेखील पाण्याखाली गेल्यामुळे भरती कालावधीत वीरवाडीमार्गे जाणारी मोंड बापर्डे येथील वाहतूक बंद होती. भरती संपल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

उधाणाच्या भरतीचे पाणी वीरवाडी कॉजवेवरून जात असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होते. त्यामुळे या कॉजवेची व वीरवाडी रस्त्यालगत खाडीकिनारी असलेल्या बंधाऱ्यांचीही उंची वाढवावी अशी मागणी वीरवाडी ग्रामस्थांनी मेरीटाईम बोर्डाकडे केली होती.

ग्रामस्थांच्या मागणीला उत्तर देताना मेरीटाईम बोर्डाने सागरी धूप प्रतिबंधक बांधकामे ही राज्यस्तरीय योजना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात येत आहे असे आदेश पारीत झाले असून त्यामुळे सदर काम हे पतन विभागाकडून करणे उचित होईल असे उत्तर देऊन पतन विभागाकडे बोट दाखविल्याने हा प्रश्न ह्यजैसे थेह्ण राहीला आहे.ग्रामस्थांची नाराजीकॉजवेची उंची वाढविण्याशिवाय पर्याय नसून गेली कित्येक वर्षे वीरवाडी ग्रामस्थांकडून याबाबत मागणी होऊनही शासनस्तरावरून योग्य दखल घेतली जात नसल्यामुळे हा प्रश्न सुटणार केव्हा असा सवाल वीरवाडीवासीयांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीRainपाऊसTrafficवाहतूक कोंडी