सिंधुदुर्ग : बुर्डी पूल येथे कार दरीत कोसळली,  कोणीही जखमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:07 IST2018-04-30T14:07:50+5:302018-04-30T14:07:50+5:30

आंबोली-सावंतवाडी मार्गावर बुर्डी पूल येथे भरधाव वेगाने जाणारी कार रस्ता सोडून दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी सकाळी घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

Sindhudurg: The car fell into the river at Budhi Bridge, no one was injured | सिंधुदुर्ग : बुर्डी पूल येथे कार दरीत कोसळली,  कोणीही जखमी नाही

सिंधुदुर्ग : बुर्डी पूल येथे कार दरीत कोसळली,  कोणीही जखमी नाही

ठळक मुद्दे बुर्डी पूल येथे कार दरीत कोसळली,  कोणीही जखमी नाहीकारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

सावंतवाडी : आंबोली-सावंतवाडी मार्गावर बुर्डी पूल येथे भरधाव वेगाने जाणारी कार रस्ता सोडून दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी सकाळी घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

गोव्याला जाणाऱ्या आंबोलीच्या पर्यटकांची ही कार असून, कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. दरम्यान, जिल्हा वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाला नाही, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याठिकाणी याअगोदही काही कार चालकांचा ताबा सुटून कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी संबंधित विभागाने रेलिंग उभारावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Sindhudurg: The car fell into the river at Budhi Bridge, no one was injured