सिंधुदुर्ग : ब्रेक न लागल्याने बसला अपघात, मोठी दुर्घटना टळली : बस मातीत रूतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:07 IST2018-06-19T16:07:30+5:302018-06-19T16:07:30+5:30

ब्रेक न लागल्यामुळे वेताळबांबर्डे येथे आरामबसला अपघात झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर बसचा पुढील भाग महामार्गालगतच्या मातीत जाऊन रूतला होता.

Sindhudurg: Bus accident due to break, no big accident avoided: bus mats roatli | सिंधुदुर्ग : ब्रेक न लागल्याने बसला अपघात, मोठी दुर्घटना टळली : बस मातीत रूतली

ब्रेक न लागल्याने बस महामार्गानजीकच्या मातीत रूतली.

ठळक मुद्देब्रेक न लागल्याने बसला अपघातमोठी दुर्घटना टळली : बस मातीत रूतली

कुडाळ : ब्रेक न लागल्यामुळे वेताळबांबर्डे येथे आरामबसला अपघात झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर बसचा पुढील भाग महामार्गालगतच्या मातीत जाऊन रूतला होता.

सोमवारी सकाळी वेंगुर्लेहून पुणे येथे जाणारी लक्झरी बस वेताळबांबर्डे येथे आली असता या बसच्या पुढे चालणाऱ्या एका कारचालकाने खड्डा चुकविण्यासाठी अचानक ब्रेक लावला. त्यामुळे धडक टाळण्यासाठी लक्झरी बसच्या चालकानेही तत्काळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक लागला नाही.

बसच्या चालकाने त्याही परिस्थितीत बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र बस महामार्गाच्या कडेला जात मातीत रूतली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताने प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. या अपघाताबाबत कुडाळ पोलिसांत नोंद नव्हती.
 

Web Title: Sindhudurg: Bus accident due to break, no big accident avoided: bus mats roatli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.