सिंधुदुर्ग : दरड कोसळून भुईबावडा घाटमार्ग ठप्प, वाहतूक करुळ घाटमार्गे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 15:47 IST2018-07-14T14:03:53+5:302018-07-14T15:47:16+5:30
भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळून वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली असून कोसळलेल्या दरडीमध्ये मोठे दगड असल्याने संध्याकाळपर्यंत भुईबावडा घाटमार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गाची वाहतूक करुळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : दरड कोसळून भुईबावडा घाटमार्ग ठप्प, वाहतूक करुळ घाटमार्गे
प्रकाश काळे
वैभववाडी(सिंधुदुर्ग): भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळून वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली असून कोसळलेल्या दरडीमध्ये मोठे दगड असल्याने संध्याकाळपर्यंत भुईबावडा घाटमार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गाची वाहतूक करुळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे.
शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास गगनबावड्यापासून दीड किलोमीटरवर भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळली. त्यामुळे सकाळी आठपर्यंत तीन तास वाहतूक ठप्प होती.
बांधकामच्या रस्ता कामगारांनी लहान दगड आणि माती बाजूला करुन छोट्या वाहनांना मार्ग खुला करुन दिला. त्यानंतर जेसीबी पोचल्यावर सकाळी 10 पासून दरड हटविण्यासाठी घाटमार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
दरडीच्या ढिगा-यातील मोठे दगड हटविण्यात घाट परिसरात पडणा-या पावसाचा व्यत्यय येत आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत मार्ग सुरळीत केला जाण्याची शक्यता आहे. एक जेसीबी, ट्रॅक्टर सार्वजनिक बांधकामचे कामगार दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवित आहेत.