सिंधुदुर्ग : मालवण बंदरजेटी परिसरात दुर्गंधी, पर्यटकांनाही त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 16:58 IST2018-05-29T16:58:58+5:302018-05-29T16:58:58+5:30
मालवण बंदरजेटी परिसरातील नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेने यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

मालवण बंदरजेटी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
मालवण : मालवण बंदरजेटी परिसरातील नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसह येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेने यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
मालवण बंदरजेटी परिसरात नगरपरिषदेने उभारलेले सुलभ शौचालय समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
शौचालय परिसरात पर्यटक व नागरिकांकडून कचरा याचठिकाणी फेकला जात आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मालवण नगरपरिषदेने राबविलेल्या विविध उपक्रमात या दुर्गंधीमुळे परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे.
शहर स्वच्छता करण्याबरोबरच बंदरजेटीवर येणाऱ्या हजारो पर्यटकांना दुर्गंधीतून जावे लागत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.