शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सिंधुदुर्ग : शाखा व्यवस्थापकाचे असभ्य वर्तन, माफी मागितल्याने ठिय्या मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:20 IST

कर्ज वसुलीसाठी दुकानात गेलेल्या बँक आॅफ इंडिया बांदा शाखेचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घरडे यांनी तेथील महिलेशी असभ्य वर्तन केल्याने बांदा ग्रामस्थांनी घरडे यांच्यावर कारवाईसाठी बांदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देशाखा व्यवस्थापकाचे असभ्य वर्तन, बांदा येथील प्रकार माफी मागितल्याने ठिय्या आंदोलन मागे

बांदा : कर्ज वसुलीसाठी दुकानात गेलेल्या बँक आॅफ इंडिया बांदा शाखेचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घरडे यांनी तेथील महिलेशी असभ्य वर्तन केल्याने बांदा ग्रामस्थांनी घरडे यांच्यावर कारवाईसाठी बांदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

दुपारी ३ वाजता हा प्रकार घडला. सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते. दरम्यान, कुडाळ येथील बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दाखल होत या प्रकाराबाबत माफी मागून घरडे यांची तत्काळ बदली करण्याचे मान्य केल्यानंतर या प्रकरणावर तडजोडीने पडदा टाकण्यात आला.बँक आॅफ इंडिया बांदा शाखेचे व्यवस्थापक घरडे एका कर्मचाऱ्यासहीत दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बांदा शहरातील एका दुकानात कर्ज वसुलीसाठी गेले होते. यावेळी दुकानात असलेल्या महिलेसोबत त्यांनी असभ्य भाषेत वर्तन केले. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या काही ग्रामस्थांनी पाहिला. त्यानंतर बांदा सरपंच मंदार कल्याणकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या कानावर हा प्रकार ग्रामस्थांनी घातला.

संतप्त झालेल्या सरपंच व सदस्यांनी जाब विचारण्यासाठी बँकेच्या शाखेत जाऊन घरडे यांना गाठले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्याला या प्रकाराबाबत विचारले असता त्याने घरडे यांनी महिलेशी असभ्य वर्तन केल्याचे सांगितले. त्यामुळे सदस्य अधिकच आक्रमक झाले.हळूहळू याबाबतची बातमी संपूर्ण शहरात पसरताच संतप्त ग्रामस्थांनी बँकेच्या शाखेकडे मोठी गर्दी केली. घरडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर बांदा पोलीस ठाण्याचे जयदीप कळेकर घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ बँकेच्या वरिष्ठांना बोलवा, अन्यथा तुम्हांला येथून जाऊ देणार नाही, असे ग्रामस्थांनी त्यांना सांगितले.दरम्यान, कुडाळ येथील बँकेचे वरिष्ठ अधिकारी बांद्यात हजर झाल्यानंतर हा प्रकार पोलीस ठाण्यात नेण्यात आला.दरम्यान, त्या महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

त्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, हा प्रकार अधिकच चिघळल्याने अखेर वरिष्ठांनी माफी मागत घरडे यांची बदली करण्याचे मान्य केले. शिवाय असे प्रकार पुन्हा होणार नसल्याचे सांगितल्यानंतर हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले. या घटनेने बांदावासीयांची एकजूट पहायला मिळाली.कर्मचारी त्रस्तबांदा शाखेत घरडे दाखल झाल्यापासून शाखेतही त्यांनी आपली दहशत ठेवली होती. कर्मचाऱ्यांना त्रास देणे, त्यांच्या तक्रारी करणे आदी प्रकार त्यांच्याकडून सुरू होते. त्यामुळे कर्मचारीही त्रस्त होते. ठेवीदारांबाबतही घरडे यांचा हाच स्वभाव असल्याने काहींनी आपली खाती बंद केली होती, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसbankबँक