पती-पत्नीने एकाच वेळी संपवले जीवन; नदीपात्रात आढळले मृतदेह
By संदीप बांद्रे | Updated: March 26, 2024 23:11 IST2024-03-26T22:56:00+5:302024-03-26T23:11:02+5:30
शरद पाटील (४२), स्वाती शरद पाटील (४०, दोघेही सध्या राहणार पिंपळी) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

पती-पत्नीने एकाच वेळी संपवले जीवन; नदीपात्रात आढळले मृतदेह
चिपळूण : एकाचवेळी पती-पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. यापैकी पत्नीचा मृतदेह चिपळूण शहरानजीच्या खेर्डी येथील नदीपत्रात, तर पतीचा मृतदेह पिंपळी येथे त्याच्या घरी आढळून आला. कोणत्या कारणातून ही आत्महत्या झाली असावी याचे कारण पुढे आलेले नसून पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.
शरद पाटील (४२), स्वाती शरद पाटील (४०, दोघेही सध्या राहणार पिंपळी) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असणारे शरद पाटील, स्वाती पाटील हे दोघे काही दिवसांपासून पिंपळी येथे भाड्याने रहात होते. शरद पाटील यांना कंबरेच्याखाली अपंगत्व आल्याने ते घरीच होते. असे असताना कोणत्यातरी अज्ञात कारणातून त्यांनी घरीच विष प्राशन करून आत्महत्या केली. तसेच पत्नीने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पत्नीचा मृतदेह खेर्डी नदीपात्रा आढळून आला. या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी गेले होते. कोणत्या कारणातून ही आत्महत्या केली असावी याचे कारण स्पष्ट झालेले नसून रात्री उशिरापर्यंत याबाबत प्रक्रिया सुरु असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.