शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

बांदा शहरवासीयांना बिबट्याचे दर्शन

By admin | Updated: November 9, 2014 23:40 IST

परिसरात भीती : वनविभागाने लक्ष देण्याची गरज

बांदा : बांदा शहरातील निमजगावाडी येथे भर वस्तीतील बांदा- वाफोली हमरस्त्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दृष्टिस पडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने रस्त्यावरच ठाण मांडल्याने या मार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र, बिबट्याने पाच मिनिटांनंतर जवळच्या झाडीचा आश्रय घेतला. या घटनेनंतर वनविभागाने याची दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.वाफोली, निमजगा परिसरात गेले काही दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. बिबट्याचा वावर भर वस्तीत असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेले कित्येक दिवस बिबट्या नजरेस पडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. गतवर्षी भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या वाफोली येथे विहिरीत पडून मृत झाला होता. त्यानंतर पुन्हा या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे.काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निमजगावाडी येथील भर वस्तीतील रस्त्यावर बिबट्याचे दर्शन वाहनचालकांना झाले. रस्त्यावर पाच मिनिटे बिबट्या घुटमळला. त्यानंतर त्याने लगतच्या झाडीत आश्रय घेतला. अचानक बिबट्या रस्त्यावर अवतरल्याने वाहनचालकांची बोबडी वळाली.अद्यापपर्यंत या परिसरात बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ला होण्याची घटना घडली नसली तरीही बिबट्याच्या मुक्त वावरामुळे स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. बांदा-वाफोली मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तसेच निमजगावाडी हा भाग बांदा शहरात येत असल्याने याठिकाणी नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे या बिबट्याचा वनखात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)