शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कुडपकर यांच्या चौथ्या पिढीचा श्रीगणेशा, चिमुकले बाप्पा घडविण्यात मग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 18:54 IST

गणपती बाप्पा कसा घडविला जातो हे ज्या वयात दुरुनच पाहिलं जातं त्याच वयात ही लहान मुले मन लाऊन गणपती रंगवित आहेत.

प्रथमेश गुरव

वेंगुर्ला : देवाच्या भक्तीला किवा सेवेला ना काळ, ना वेळ त्याचप्रमाणे ना जात, ना पात. एवढचं नव्हे तर वयाची सुद्धा अट नसते, याचे चित्र वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध कुडपकर यांच्या गणपतीच्या चित्र शाळेत दिसून येत आहे. कुडपकर यांची चौथी पिढी जी अनुक्रमे आठवी व सहावी इयत्तेत शालेय शिक्षण घेत आहेत ती गुंजन व चिन्मय ही लहान मुले बाप्पा घडविण्यात मग्न आहेत. यांच्यासोबत इयत्ता पाचवी, सहावीतील मुलेही गणपतीचे रंगकाम करीत आहेत.आपल्या संस्कृतीतील काही सण-उत्सव हे मनुष्याच्या कलेला वाव देणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे आणि त्याच्यातून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्नही सोडविणारे आहेत. कोकणातील असाच महत्त्वाचा सण गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणपतीच्या सर्वच शाळेत लगबग दिसून येत आहेत. ब-याच शाळांमध्ये मूर्तींचे रंगकाम संपुष्टात आले सुद्धा. तर काही ठिकाणी रात्र रात्र जागवून मूर्ती बनविण्याचे काम सुरु आहे. ब-याच शाळा मालकांच्या अख्ख्या कुटुंबानेच बाप्पाच्या सेवेत झोकून घेतले आहे. मूर्ती घडविण्याच्या या सेवेत कित्येकजणांच्या पिढ्यान्पिढ्या मनोभावे कार्य करत असतानाच वेंगुर्ला शहरातील कॅम्प-भटवाडी येथील कुडपकर यांच्या मूर्ती शाळेत सुदर्शन कुडपकर यांची चिमुकली नातवंडे हातामध्ये रंगाचा ब्रश आणि स्प्रेगन घेऊन गणपती रंगविताना दिसत आहेत.गणपती बाप्पा कसा घडविला जातो हे ज्या वयात दुरुनच पाहिलं जातं त्याच वयात ही लहान मुले मन लाऊन गणपती रंगवित आहेत. त्यांच्यासोबत तनिश धर्णे, यतिन कुडपकर, साहिल कुडपकर, हेमांशु कुडपकर कार्तिक रेडकर आदी प्राथमिक शिक्षण घेणारी मुलेही अभ्यासातून वेळ मिळेल त्याप्रमाणे गणपती शाळेत येऊन रंगकामाच्या निमित्ताने बाप्पाची सेवा करीत आहेत. कलेचा अधिपती आणि बुद्धीचा दाता असलेला, ज्याच्या हाती या विश्वाची सुत्रे आहेत तोच गणपती या लहान मुलांना बुद्धी देऊन त्यांच्याकडून स्वतःला साकारुन घेत आहे. हे दृश्य पहातच रहावे अशाप्रकारचे आहे.सुदर्शन कुडपकर यांच्या वडिलांनी सुरु केलेल्या या गणपतीच्या शाळेत त्यांच्या तिस-या पिढीने यात झोकून घेतले असतानाच चौथ्या पिढीने आपला श्रीगणेशा केला आहे. सध्याचे युग हे मोबाईलचे आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांच्याही हातामध्ये मोबाईल दिसून येतो. त्यातील गेम हा तर लहान मुलांचा एक छंदच झाला आहे, असेही असताना ही सर्व लहान मुले मात्र, आपली कला साकारत आहेत. मुलं ही अनुकरणप्रिय असतात. याचा उत्तम नमुना इथे पहायला मिळतो. मोबाईलमध्ये नेमके काय पहावे ती कलात्मक दृष्टी आत्मसात करणारी ही चिमुकली बोटे सराईतपणे बाप्पाचा आकार घडविताना, रंगविताना दिसतात तेव्हा थक्क व्हायला होते. सोशल मिडियाच्या मायाजालात आपण फक्त तक्रारीच करीत राहितो. पण इथे तर या मुलांना एक वेगळाच अद्भूत अनुभूती देणारा खजिना मिळाल्याचे दिसते.ज्येष्ठ मूर्तीकारांचे मिळालेले मार्गदर्शन, त्यांनी दिलेला पाठींबा यामुळे लहान मुलांच्या ठिकाणी असलेली भिती दूर झाल्याने मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण न ठेवता मातीकाम ते रंगकाम असा त्यांचा हा प्रवास निर्विघ्नपणे सुरु आहे. सर्वसामान्यतः माणसाची ओळख ही त्याच्या पिढीजात व्यवसायामुळे, कलेमुळे होत असते. मूर्तीकलेच्या माध्यमातून असलेली आपली ओळख या लहान मुलांनीही जपली आहे आणि यापुढेही जपणार आहेत यात शंकाच नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGanesh Mahotsavगणेशोत्सव