शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

हरकुळ बुद्रुक पंचायतला कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: December 29, 2014 23:35 IST

मंत्र्यांचे लक्ष वेधले : दत्तक ग्राम योजना नाकारली

ओरोस : खासदारांकडून दत्तक गाव घ्यावयाची आदर्श दत्तक ग्राम योजना हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत स्विकारण्यास तयार नसल्याबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले. केसरकर यांनी यासंदर्भात गंभीर दखल घेत ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिले आहेत.केंद्र शासनाच्या योजनेत प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन त्या गावात आदर्श दत्तक ग्रामयोजना राबवून केंद्र शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करावी व ही संकल्पना सर्वांनी राबवावी. त्याप्रमाणे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक हे गाव दत्तक घेतले. मात्र ते गाव दत्तक घेताना आदर्श दत्तक ग्राम योजना राबविण्यासाठी संबधित ग्रामपंचायत बॉडीचा ठराव आवश्यक असतो. परंतु खासदार अरविंद सावंत यांनी हरकुळ बुद्रुक गाव दत्तक घ्यायचा निर्णय होऊनसुद्धा ग्रामपंचायत बॉडी ही योजना स्विकारण्यास तयार नाही. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आदर्श दत्तक ग्राम योजना हरकुळ ग्रामपंचायत राबविण्यास तयार नसेल तर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला. खासदार सावंत यांच्या तक्रारीची केसरकर यांनी दखल घेत त्या ग्रामपंचायतीला कारणेदाखवा नोटीस बजावा असे आदेश जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. (वार्ताहर)