Shivdao woman dies of fever | शिवडाव येथील महिलेचा तापसरीने मृत्यू
शिवडाव येथील महिलेचा तापसरीने मृत्यू

ठळक मुद्देशिवडाव येथील महिलेचा तापसरीने मृत्यूकिडनी, लिव्हर आदी अवयवांवर परिणाम

कणकवली : शिवडाव ओटोसवाडी येथील अनुजा आत्माराम लाड (३५) या ताप येत असलेल्या महिलेचा गुरूवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शिवडाव येथील माजी उपसरपंच आत्माराम लाड यांची पत्नी असलेल्या अनुजा हिला सात, आठ दिवस ताप येत असल्याने त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून बुधवारी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील एका दुसऱ्या खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी हलविण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. ताप येत असतानाच तिच्या शरीरातील प्लेटलेट कमी झाल्या होत्या. तसेच किडनी, लिव्हर आदी अवयवांवर परिणाम झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अनुजा यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, सासू, सासरे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवडाव गावावर शोककळा पसरली आहे.
 

Web Title: Shivdao woman dies of fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.