भरधाव कंटेनरची जेसीबीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 02:17 PM2019-06-20T14:17:32+5:302019-06-20T14:18:10+5:30

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली-पावणादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यासमोर उभ्या असलेल्या जेसीबीला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने मागून धडक दिली. या अपघातात ...

Shipping of the container jerseys | भरधाव कंटेनरची जेसीबीला धडक

जानवली येथे भरधाव कंटेनरने जेसीबीला धडक दिल्याने अपघात झाला.

Next
ठळक मुद्देभरधाव कंटेनरची जेसीबीला धडककंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली-पावणादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यासमोर उभ्या असलेल्या जेसीबीला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने मागून धडक दिली. या अपघातात जेसीबीत बसलेले विठ्ठल सतीश चौगुले यांच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे. तर जेसीबीचेही नुकसान झाले आहे.

हा कंटेनर (क्रमांक एम. एच. ४३-डीबी-२९०५) मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने त्याने रस्त्यावर उभ्या जेसीबीला धडक दिली. या अपघातात जेसीबीचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती जेसीबी मालक रामदास विखाळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. या अपघातप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Shipping of the container jerseys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.