शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
2
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
3
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
4
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
5
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
6
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
7
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
8
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
9
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
10
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
11
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
13
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
14
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
15
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
16
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
17
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
18
Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
19
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
20
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: युतीसाठी सकारात्मक, मात्र..; शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकरांनी मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:32 IST

Local Body Election: भाजप पदाधिकार्‍यांच्या वक्तव्यावर नाराजी

सावंतवाडी : युती होण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. भाजप व शिंदेसेना या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते  प्रयत्न करत आहेत. युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवू अशी भूमिका शिंदेसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी मांडली. ते शनिवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मालवणात भाजप पदाधिकार्‍यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिंदेसेनेचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना समज देण्यात यावी अशी मागणी केली.केसरकर म्हणाले, युती होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अद्यापही बोलणी सुरू आहेत. याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत. मात्र नेमकी आतापर्यंत भूमिका वरिष्ठांनी जाहीर केलेली नाही. त्यामुळे आताच मी यावर अधिकृत काही बोलू शकत नाही. परंतु सर्व बाजूने प्रयत्न सुरू आहेत. युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. त्या दृष्टीने सर्व उमेदवारांनी आपापले फॉर्म भरले आहेत. चर्चा होईपर्यंत थांबणे चुकीचे ठरणार आहे. मालवण येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका करण्यात आली होती. याबाबत केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, असे कोण म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. मालवण- कुडाळ मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी बोलताना तारतम्य पाळणे गरजेचे आहे. शिंदे सेनेचे अस्तित्व नाही, असे बोलणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी टोकाचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. याबाबत त्यांना वरिष्ठाने समज द्यावी, असे सांगून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.शिंदेसेनेकडून अँड निता सावंत-कविटकर यांचे नाव जाहीर नगरपालिकेसाठी शिंदे सेनेच्या माध्यमातून सर्व उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र आयत्यावेळी युती झाली तर काही उमेदवारांना अर्ज मागे घ्यावे लागतील तशी त्यांना कल्पना देण्यात आली आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी  ॲड. निता कविटकर-सावंत यांचे नाव ठरल्याचे यावेळी केसरकर यांनी जाहीर केले. रविवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Positive for alliance, but...: Shinde Sena leader Deepak Kesarkar's clear stance

Web Summary : Shinde Sena is positive about an alliance for local body elections. Senior leaders are trying, but they are ready to fight independently if needed. Deepak Kesarkar expressed displeasure over BJP officials' statements and announced Nita Sawant-Kavitkar as a candidate.