शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

शेखर निकम यांनी जिल्हाध्यक्षपद सोडले

By admin | Updated: November 16, 2014 00:23 IST

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे गुरुवारी दिला. मात्र, आपण चिपळूण मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार असून या मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी सदैव कार्यरत राहणार आहोत, असे शेखर निकम यांनी स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष म्हणून शेखर निकम यांनी साडेतीन वर्ष जिल्हाभर प्रामाणिकपणे व तळमळीने काम केले होते. पक्षांतर्गत गटबाजी नियंत्रित करण्यात त्यांना काहीअंशी यश आले होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाने विश्वास टाकून चिपळूण विधानसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊनही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांचा निसटता पराभव झाला. राष्ट्रवादीविरोधी असलेली लाट व पक्षांतर्गत कुरबुरी यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी जिल्ह्यात पक्षाला पूर्ण वेळ काम करु शकेल, अशा अध्यक्षाची गरज आहे. आपण शैक्षणिक व इतर कामामुळे इतका वेळ देऊ शकणार नाही. शिवाय चिपळूण मतदारसंघावर आपल्याला लक्ष केंद्रीत करावयाचे आहे. त्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे निकम यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.आपण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असलो तरी पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांचे पाठबळ सदैव माझ्यामागे आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे यापुढेही आपण पवार यांच्या विचारांचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही निकम यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)