कणकवली येथे अबिद नाईक यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:00 IST2018-12-04T10:58:58+5:302018-12-04T11:00:37+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास भेट दिली.

कणकवली येथे अबिद नाईक यांच्या निवासस्थानी शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले.
कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास भेट दिली.
यावेळी अबिद नाईक यांनी सहकुटुंब शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
तसेच पवार यांच्या आवडत्या शिरकुर्मा व कोकणी मेव्याने नाईक कुटुंबियाने त्याचा पाहुणचार केला. नाईक कुटुंबियांच्या आदरातिथ्याने शरद पवार अगदी भारावून गेले.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या त्यांनी सदिच्छाही स्वीकारल्या.
राष्ट्रवादीचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्रदेश चिटणीस व्हिक्टर डॉन्टस, राजेश पाताडे, विलास गावकर , अब्दुल नाईक, हवाबी नाईक, इम्रान शेख, आसिफ नाईक, अनिस नाईक, रुबिना नाईक, हुमेरा नाईक, नजमा नाईक तर स्वाभिमानचे नगरसेवक विराज भोसले, अभिजीत मुसळे, बंडू हर्णे, संजय कामतेकर तसेच अनिल डेगवेकर आदी उपस्थित होते.
कणकवली शहरातून रॅली !
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानातून शरद पवार हे अबिद नाईक यांच्या निवासस्थानी यायला निघाले. त्यावेळी तेथून कणकवली बाजारपेठ मार्गे नाईक यांच्या निवासस्थाना पर्यन्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दुचाकीची रॅली काढली.
रॅलीच्या समारोपानंतर फटाक्यांची आतशबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले. कणकवली शहरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडे लावण्यात आले होते.