शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

सतरा वाघनख्यांसह बिबट्याचे अवशेष जप्त, पाच ते सात महिन्यांपूर्वी केली होती शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 17:53 IST

प्रमुख सूत्रधाराला घेऊन तपासी अधिकाऱ्यांनी महाळुंगेत जाऊन नदी किनाऱ्याच्या जंगलमय भागात ज्या ठिकाणी बिबट्याची शिकार झाली होती, तो परिसर पिंजून काढला. तपासादरम्यान देवळेकर याने जंगलात लपवून ठेवलेल्या सतरा वाघनख्या, हाडे पोलिसांच्या ताब्यात दिली.

कणकवली : बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांपैकी वामन शिवाजी देवळेकर (वय ४३, रा. महाळुंगे-देवगड) याच्याकडून बिबट्याच्या जंगलात लपवून ठेवलेल्या सतरा वाघनख्या, हाडे, आदी अवशेषांसह शिकारीसाठी वापरलेला भाला, ॲल्युमिनिअम तारेची फासकी, कोयता, छोटा सुरा, आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.बिबट्या कातडी तस्करी प्रकरणात सुरुवातीला दारूम माळवाडी येथे दोन व नंतर महाळुंगे येथे एक अशा तीन संशयितांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी पहाटे बिबट्याच्या शिकारीतील प्रमुख सूत्रधार वामन शिवाजी देवळेकर (४३), जयसिंग पांडुरंग नवले (४६) आणि राकेश पांडुरंग नवले (३६, सर्व रा. महाळुंगे) या तिघांना अटक केली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.या तिघांपैकी वामन देवळेकर या प्रमुख सूत्रधाराला घेऊन तपासी अधिकारी अनिल हाडळ, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे, पांडुरंग पांढरे यांनी बुधवारी महाळुंगेत जाऊन नदी किनाऱ्याच्या जंगलमय भागात ज्या ठिकाणी फासकी लावून बिबट्याची शिकार झाली होती, तो परिसर पिंजून काढला. तपासादरम्यान देवळेकर याने जंगलात लपवून ठेवलेल्या सतरा वाघनख्या, हाडे पोलिसांच्या ताब्यात दिली. तसेच शिकारीसाठी वापरलेला भाला, फासकीची तार व अन्य साहित्यही पोलिसांकडे दिले.पाच ते सात महिन्यांपूर्वी वामन देवळेकर, जयसिंग नवले आणि राकेश नवले या तिघांनी फासकीत अडकलेल्या बिबट्याची शिकार केली होती. त्यानंतर बिबट्याचे कातडे काढले, नखे काढली आणि हे सर्व अवशेष विक्रीच्या 4 उद्देशाने जंगलात लपवून ठेवले होते. या प्रकरणात यापूर्वी अटक केलेले सुभाष तावडे (रा. ओझरम), प्रकाश देवळेकर, संजय घाडीगावकर (रा. महाळुंगे) यांचा सहभाग कातडीच्या विक्री व्यवहारात होता. पोलिसांनी ३ बिबट्याच्या शिकारप्रकरणी सर्व माहिती संशयित आरोपीकडून घेत अवशेष जप्त केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीleopardबिबट्याTigerवाघPoliceपोलिस