शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

सी वर्ल्डचे भूसंपादन संशयास्पद

By admin | Updated: November 7, 2014 23:40 IST

शैलेश भोगले : अतिरिक्त जमीन संपादनाचा घाट

कणकवली : सी वर्ल्ड प्रकल्पाचा अद्याप प्रकल्प अहवाल तयार झालेला नाही. प्रकल्पाला सुमारे ३०० एकर एवढी जमीन लागणार हे शासनाने मान्य केले असताना पार्किंग आदी सुविधांच्या नावाखाली १०९० अतिरीक्त जमीन संपादन करण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी जयसिंग नाईक उपस्थित होते. भोगले म्हणाले की, १४ मे २०१३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत समुद्रविश्व (ओशन वर्ल्ड) असा या प्रकल्पाच्या नावात बदल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार झालेला नाही. पुणे येथील सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क या संस्थेला हा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. प्रकल्प आराखडा तयार नसताना ओशन वर्ल्डसाठी ३०० आणि पार्किंग, रेस्टॉरंट आदी सुविधांसाठी १०९० अशा एकूण १३९० एकर जमीन संपादन करण्यास मंजुरी दिली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजनमधून प्रकल्पासाठी ३० कोटी आगावू देण्यास मान्यता दिली आहे. एकूण भूसंपादनासाठी २२५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प राज्यशासन करत आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणून हा प्रकल्प उभा राहत असताना जिल्हा नियोजनमधून त्यासाठी निधी देण्याची गरज नाही. मालवण येथे सी वर्ल्डसंदर्भातील चित्रफीत दाखवून लोकांची दिशाभूल करण्यात आली. डॉल्फेनॅरियम तसेच शार्क, व्हेल मासे बंदिस्त करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ‘झू’ विभागाची परवानगी अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यासाठी अद्याप प्रस्तावही सादर झालेला नाही. डॉल्फीन हा भारताचा ‘राष्ट्रीय समुद्री जीव’ असल्याने त्याला बंदीस्त करण्यावर बंदी आहे. त्यामुळे सी वर्ल्ड हा वॉटरपार्क होण्याची शक्यता जास्त आहे. आंतरराष्ट्रीय संघटना ‘पेटा’ चाही विरोध या प्रकल्पाला आहे. सीआरझेडचे निर्बंधही लागू आहेत. असे असताना या प्रकल्पासाठी भूसंपादनाची गडबड करण्यात येत आहे. शासनाकडून याबाबत पारदर्शकता ठेवण्यात आलेली नसून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे ही माहिती दिली जाणार असल्याचे शैलेश भोगले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)