विद्युत वाहिनी अंगावर पडून शाळकरी मुलाचा मृत्यू; ओटवणे येथील घटनेने हळहळ

By अनंत खं.जाधव | Published: June 29, 2023 11:55 PM2023-06-29T23:55:00+5:302023-06-29T23:55:17+5:30

विनय याला रूग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला पण तो तत्पूर्वीच मृत पावला होता.

School boy dies after falling on power line; The incident in Ottawane | विद्युत वाहिनी अंगावर पडून शाळकरी मुलाचा मृत्यू; ओटवणे येथील घटनेने हळहळ

विद्युत वाहिनी अंगावर पडून शाळकरी मुलाचा मृत्यू; ओटवणे येथील घटनेने हळहळ

googlenewsNext

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून त्यातच ओटवणे बावळाट जवळ गुरूवारी रात्री च्या सुमारास विद्युतभारीत वीज वाहिनी तुटून अंगावर पडल्याने ओटवणे गवळीवाडी येथील विनय विष्णू कोटकर (१४) या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे.

विनय हा रात्रीउशिरा ओटवणे - बावळाट जवळच तेरेखोल नदी पात्रा पलीकडे गेलेली गुरे घेऊन येत असतनाच अचानक त्याच्या अंगावर विद्युतभारित तार कोसळून तो जागीच मृत पावला या घटनेची माहिती मिळताच ओटवणे बावळाट मधील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत विनय याला रूग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला पण तो तत्पूर्वीच मृत पावला होता.

विनय हा ओटवणे हायस्कूलमध्ये इयत्ता नववी इयत्तेत शिकत होता. या घटनेचे वृत्त समजताच ओटवणेसह बावळाट गावावर शोककळा पसरली. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आंबोली पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला आहे.

Web Title: School boy dies after falling on power line; The incident in Ottawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.