शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

स्वाभिमानच्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ : पोलीस उपनिरीक्षकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:56 PM

महाराष्ट्र स्वाभिमानच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सातत्याने अश्लील भाषेत शिवीगाळ व गैरवर्तन करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप संशयितास पकडण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ पक्षाच्यावतीने शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक सुजित घाटगे यांना घेराव घालण्यात आला.

ठळक मुद्देस्वाभिमानच्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ : संशयितांना पकडण्यात अपयशपोलीस उपनिरीक्षकांना घेराव

दोडामार्ग : महाराष्ट्र स्वाभिमानच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सातत्याने अश्लील भाषेत शिवीगाळ व गैरवर्तन करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप संशयितास पकडण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ पक्षाच्यावतीने शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक सुजित घाटगे यांना घेराव घालण्यात आला.राजकीय दबाव असल्याने पोलीस संशयितास पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी तालुकाध्यक्ष संतोष नानचे यांनी केला. तसेच जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नसल्याचा इशारा दिला.महाराष्ट्र स्वाभिमानच्या तालुक्यातील दोन महिला पदाधिकाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून भ्रमणध्वनीवरून अज्ञाताकडून अश्लील भाषेत शिवीगाळ केली जात असल्याचा प्रकार घडला.याबाबत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला. पण गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी संशयिताच्या मुसक्या आवळण्यात अपयश आल्याने स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष नानचे, उपजिल्हाध्यक्ष शैलेश दळवी, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी, कल्पना बुडकुले, शिवाजी गवस आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.गृहराज्यमंत्री यांच्या मतदार संघात ही परिस्थिती असेल तर पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा तरी कसा? असा सवाल यावेळी नानचे यांनी उपस्थित केला. यावेळी संशयिताचे लोकेशन भेडशी येथे मिळाले असून, तो वापरत असलेले सिमकार्ड छत्तीसगड येथील परप्रांतियाच्या नावावर नोंदणीकृत आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक घाटगे यांनी दिली. तसेच सीडीआर मिळाल्यावर लगेच कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र, नानचे यांनी तुम्हाला एवढी माहिती मिळून सुद्धा अद्याप आरोपीस अटक का होत नाही, असा सवाल उपस्थित करीत पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला. जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. अखेर आरोपीला अटक करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गmaharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष