शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

मोती तलावात हॉटेल उभारण्याचा डाव कुणाचा होता?  लखमसावंत यांचा सवाल, दीपक केसरकर आणि राजघराणं आमने सामने

By अनंत खं.जाधव | Updated: November 29, 2025 08:32 IST

Sawantwadi Nagar Parishad Election: वीस वर्षापूर्वी केसरकर हे एका बड्या हाॅटेल व्यावसायिकाला तलावात हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव घेऊन राजवाड्यात आले होते असा मोठा गौप्यस्फोट केला असून त्यामुळेच राजघराणे न्यायालयात गेले असल्याचा दावा लखमसावंत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

सावंतवाडी - मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मोती तलावाची मालकी यावरून सावंतवाडी चे राजकारण तापले असून आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या टिकेला भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष लखमसावंत भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर देत वीस वर्षापूर्वी केसरकर हे एका बड्या हाॅटेल व्यावसायिकाला तलावात हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव घेऊन राजवाड्यात आले होते असा मोठा गौप्यस्फोट केला असून त्यामुळेच राजघराणे न्यायालयात गेले असल्याचा दावा लखमसावंत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बाबत गैरसमज पसरविण्याचे काम सुरू असल्याचा दावा हि त्यांनी यावेळी केला आहे.

ते शुक्रवारी सावंतवाडीत बोलत होते.यावेळी लखमसावंत यांनी आमदार दीपक केसरकर संजू परब यांनी केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.राजघराणे हे जनतेच्या सेवेसाठी आहे.आमचा दरवाजा कधीही बंद नसतो फक्त आमची वेगवेगळ्या पध्दतीने बदनामी करण्याचे काम सुरू आहे.पण जनतेला सर्व काहि माहिती आहे.मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साठी  तब्बल दोन एकर जागा राजघराण्याने फुकट दिली आहे. यापूर्वी सुद्धा अनेक जागा आम्ही दिल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राजघराण्याला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका सावंतवाडीच्या विकासासाठी राजघराणे नेहमीच जनतेसोबत राहिले आहे व यापुढेही राहील. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बाबतचा सामंजस्य करार हा शासनाकडून करण्यात आला होता आमच्याकडून नाही. त्यामुळे त्यात आम्ही अटी शर्ती घालण्याचा प्रश्नच येत नाही. त्या करारावर आम्ही एकदा नाही तर दोन वेळा सह्या केल्या आहेत.

उर्वरित सही घेण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. त्यासाठी दोन एकर जागा आम्ही मोफत दिली आहे.असे असताना केवळ निवडणुकीच्या तोंडावर जनतेला चुकीची माहिती देणे योग्य नाही. स्वतःच्या निवडणुकीत त्या कराराचा फायदा करून घेतला गेला व आता गैरसमज पसरवला जात आहे. राजकारणासाठी त्याचा वापर कोण करत आहे, असा सवाल  लखमराजे भोंसले यांनी केला.

सावंतवाडीचं सौंदर्य हा ऐतिहासिक मोती तलाव आहे. त्यामुळे हे सौंदर्य जपण्यासाठी व त्याचे संवर्धन करण्यासाठी राजघराण्याने नेहमीच प्रयत्न केले आहेत व शेवटपर्यंत करीत राहू. मोती तलावामध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू देणार नाही आणि करणारही नाही. ह्याच मोती तलावात कन्स्ट्रक्शन उभारलं जाणार व मोठी तलाव जनतेसाठी राहणार नाही असे म्हणणाऱ्यांनी २००३ मध्ये मोती तलावात हॉटेल उभारण्यासाठी प्रस्ताव कोणी आणला होता हे जाहीर करावं, असं आव्हान देखील लखमसावंत यांनी केले.

मोती तलावाचे सुशोभीकरण तसेच ज्या पर्यटनाच्या दृष्टीने व लोकांच्या दृष्टीने चांगल्या गोष्टी होत होत्या त्याला आम्ही कधीही विरोध केला नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मोठी तलावातील संगीत कारंजा तसेच बोटिंग प्रकल्प याला आम्ही कधीही विरोध केला नाही. मात्र ऐतिहासिक मोती तलावाचे काँक्रिटीकरण होऊ नये व त्याचा ऐतिहासिकपणा राखला जावा हा आमचा हेतू राहिला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Motil Talao Hotel Plan: Whose Move? Lakhamsawant's Question Sparks Conflict.

Web Summary : Lakhamsawant accuses Kesarkar of proposing a hotel in Motil Talao twenty years ago. Rajgharane denies wrongdoing, asserting their commitment to public service and free land for a hospital, countering alleged defamation attempts.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकSawantwadiसावंतवाडीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDeepak Kesarkarदीपक केसरकर