शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर यांचा वंचित पक्ष फोडण्याचे आता संजय राऊत यांचे टार्गेट; नितेश राणे यांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: February 13, 2024 14:05 IST

कणकवली: संजय राऊत ज्यांच्या संपर्कात जातात तो पक्ष संपतो. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसला देखील ...

कणकवली: संजय राऊत ज्यांच्या संपर्कात जातात तो पक्ष संपतो. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना अडचणीत आणल्यानंतर आता काँग्रेसला देखील ते संपवणार हे मी अगोदर बोललो होतो. आता संजय राऊत यांचे टार्गेट प्रकाश आंबेडकर हे आहेत. वंचित बहुजन आघाडी पक्ष त्यांना फोडायचा आहे. असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.कणकवलीत येथे मंगळवारी नितेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१९ पासून जनमताच्या विरोधात जाऊन राजकारण कोणी 'नासवल' हे राऊत यांनी आरशात पाहिले असते तर त्यांना समजले असते. आता शेवटच्या घटका मोजणाऱ्या महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घालण्याचे तेव्हढेच शिल्लक राहिले आहे. आता वंचित आघाडीकडे राऊत यांनी आपला लक्ष वळविला आहे.  प्रकाश आंबेडकर यांनी वेळीच ते ओळखावे आणि आपला पक्ष वाचवावा.उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तेव्हा अजित पवार, अशोक चव्हाण हे होते. तेव्हा ते तुम्हाला चांगले होते. आता आमच्या सोबत ते आल्यावर वाईट का वाटतात ? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.काँग्रेसच्या आमदारांना पक्षात काहीच किंमत नसते !केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडताना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.त्या खऱ्या आहेत. काँग्रेस पक्षात स्वतःच्या आमदाराना किती महत्व दिले जाते, हे मी बघितले आहे. त्यावेळी कोकणातून मी एकटा काँग्रेसचा आमदार होतो. मात्र, राहुल गांधी किंवा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मला केव्हाही भेटले नाहीत. किंवा साधी चौकशी केली नाही. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता.तसाच  आजचा अशोक चव्हाण यांचा सुद्धा निर्णय योग्यच आहे,असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Rautसंजय राऊत