शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी नगरपंचायतीत ‘मशाल’ विझली, उद्धवसेनेच्या एकमेव नगरसेविकेने हाती घेतले ‘कमळ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:55 IST

वैभववाडी : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीतील उद्धवसेनेच्या एकमेव शिल्लक राहिलेल्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे यांनी शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी मत्स्य ...

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील उद्धवसेनेच्या एकमेव शिल्लक राहिलेल्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे यांनी शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे नगरपंचायतीतून मशाल पुरती विझली असून, स्वीकृत नगरसेवक मनोज (बंडू) सावंत यांच्या रूपाने उद्धवसेनेचे नाममात्र अस्तित्व उरले आहे.विधानसभेच्या निकालानंतर तालुक्यात उद्धवसेनेला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. महिनाभरात उद्धवसेनेचे नगरसेवक, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केले आहेत. तर वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत निवडून आलेल्या उद्धवसेनेच्या पाच नगरसेवकांपैकी नगरसेवक प्रदीप रावराणे, श्रद्धा रावराणे, दर्शना पवार व अपक्ष नगरसेवक सुभाष रावराणे यांनी भाजपात प्रवेश केला.त्यानंतर शहर शहरप्रमुख शिवाजी राणे यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र केला. नगरपंचायतीत सत्ताधाऱ्यांना नामोहरण करणारे उद्धवसेनेचे नगरसेवक रणजित तावडे यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केला. त्यांना बांधकाम सभापतिपदाची लॉटरी लागली. त्यानंतर उद्धवसेनेच्या सानिका सुनील रावराणे या एकमेव नगरसेविका नगरपंचायतीत होत्या.आता रावराणेंनीही नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवली येथे ‘कमळ’ हाती घेतल्याने नगरपंचायतीतील उद्धवसेनेची मशाल विझली आहे. त्यांच्यासोबत सहकारी संस्थेचे अध्यक्ष संतोष (बाबा) मांजरेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, सुनील रावराणे, दीपक माईणकर आदी उपस्थित होते.

उद्धवसेनेचे अनेक जण भाजपच्या उंबरठ्यावरउद्धवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे पक्ष संघटनेकडे असलेले दुर्लक्ष आणि अंतर्गत वादामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही मातोश्रीच्या जवळचा कोणीही पदाधिकारी संघटनेकडे लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तर अजूनही काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी तालुक्यात उद्धवसेनेला घरघर लागलेली पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा