संदेश सावंतांना आज कणकवली न्यायालयात हजर करणार, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 14:15 IST2022-02-16T14:14:56+5:302022-02-16T14:15:46+5:30

कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना कणकवली ...

Sandesh Sawant will be produced in Kankavli court today | संदेश सावंतांना आज कणकवली न्यायालयात हजर करणार, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

संदेश सावंतांना आज कणकवली न्यायालयात हजर करणार, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत आज (बुधवारी) संपत असल्याने त्यांना दुपारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

याबाबत दुपारी 3 वाजल्यानंतर प्रक्रिया सुरू  होणार असून यावेळी न्यायाधीश काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, याप्रकरणी गोट्या सावंत यांचा मोबाईल कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. काल त्यांना कोठडीतून कणकवली पोलीस ठाण्यात आणत दिवसभर चौकशी करण्यात आली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाडे व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी चौकशी केली. यावेळी पोलीस ठाण्यात भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व नातेवाईक उपस्थित होते.

Web Title: Sandesh Sawant will be produced in Kankavli court today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.