शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीचा ऱ्हास पर्यावरण,अर्थकारणाचा कणाच मोडेल  : मधुकर बाचुळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:49 IST

तब्बल १२० नद्यांचे उगमस्थान असलेला, प्रचंड जैववैविध्य असलेला सह्याद्री बेसुमार जंगलतोड, उत्खनन यामुळे धोक्यात आला आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन हा ऱ्हास न थांबवल्यास पर्यावरणाचा आणि अर्थकारणाचा कणा मोडून पडेल. प्रसंगी केरळसारखी नैसर्गिक आपत्तीही कोसळु शकते, असा इशारा पर्यावरणवादी आणि ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसह्याद्रीचा ऱ्हास पर्यावरण,अर्थकारणाचा कणाच मोडेल  : मधुकर बाचुळकरआडाळी येथे सह्याद्रीतील जैवविविधता, एक अद्भूत वैश्विक वारसा विषयावर व्याख्यान

सिंधुदुर्ग : तब्बल १२० नद्यांचे उगमस्थान असलेला, प्रचंड जैववैविध्य असलेला सह्याद्री बेसुमार जंगलतोड, उत्खनन यामुळे धोक्यात आला आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन हा ऱ्हास न थांबवल्यास पर्यावरणाचा आणि अर्थकारणाचा कणा मोडून पडेल. प्रसंगी केरळसारखी नैसर्गिक आपत्तीही कोसळु शकते, असा इशारा पर्यावरणवादी आणि ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिला आहे.दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील माऊली मंदिरात ग्लोब ट्रस्टने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. बाचुळकर यांनी विविध छायाचित्रे, नकाशे, तक्ते, आकडेवारी यांच्या स्लाईड शोच्या माध्यमातून दिलेल्या सह्याद्रीतील जैवविविधता : एक अद्भूत वैश्विक वारसा या सुमारे दोन तासांच्या व्याख्यानातून पश्चिम घाटाचे पर्यावरणीय, अर्थशास्त्रीय महत्व पटवून दिले.

डॉ. बाचुळकर यांच्याहस्ते कुंडीतील वनौषधींच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी माहिती उपसंचालक सतीश लळीत, आडाळीच्या सरपंच उल्का गावकर, कोल्हापूर येथील वृत्तछायाचित्रकार अनिल वेल्हाळ उपस्थित होते. ग्लोब ट्रस्टचे पराग गावकर यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाला प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर, लेखिका डॉ. सई लळीत, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे संजय देसाई, नम्रता देसाई, सतीश घोटगे, उद्योजक प्रविण गावकर, नंदू गावकर, निवृत्त आॅनररी कॅप्टन मंगेश गावकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.पश्चिम घाटातील जैवविविधता धोक्यातडॉ. बाचुळकर म्हणाले की, जागतिक तापमानवाढ, वातावरणातील बदल, पाणीटंचाई, अन्नटंचाई हे प्रश्न जगासमोर आवासून उभे आहेत. या भीषण परिस्थितीला मानवाचा पर्यावरणातील अवाजवी हस्तक्षेप आणि पर्यावरणाचा ऱ्हास कारणीभूत आहे. धृवीय प्रदेशातील बर्फ वितळल्याने समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून जगातील ४७ देशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील पर्यावरणाच्यादृष्टीने सह्याद्रीचे महत्व अनन्यसाधारण आहे. जगातील १७ महाजैवविविधता देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतातील हिमालय, ईशान्य भारत आणि पश्चिम घाट या तीन भागांचा जैवविविधता प्रदेशात समावेश होतो. जगात जैवविविधतेच्यादृष्टीने अतिसंवेदनशील मानल्या गेलेल्या ३५ क्षेत्रांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे आणि हाच भाग सद्या अतिशय धोक्यात आला आहे.नैसर्गिक संपत्ती वारसा म्हणून मिळालीमाहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी पश्चिम घाटातील सह्याद्रीमधील नैसर्गिक संपदा, प्राणी-पक्षी सृष्टी, जैवविविधता यांचा आणि मानवी जीवनाचा परस्परसंबंध स्पष्ट केला. ते म्हणाले की, ही नैसर्गिक संपत्ती आपणाला वारसा म्हणून मिळाली आहे.

आपण तिचे मालक नाही. तिचे जतन, संवर्धन करुन ती पुढील पिढीकडे सुपूर्द करणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु अतिपरिचयात् अवज्ञा अशी आपली अवस्था झाली आहे. अनास्थेमुळे आपण हा वारसा दिवसेंदिवस गमावत चाललो आहोत. मात्र ही अनास्था परवडणारी नाही. या वारशाचे जतन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :environmentवातावरणsindhudurgसिंधुदुर्ग