शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नवदुर्गांच्या दर्शनाबरोबर सागर दर्शनही!

By admin | Updated: October 5, 2015 00:06 IST

प्रांताधिकारी यांची संकल्पना : प्रगत राजापूर, माय राजापूरचा सहभाग

राजापूर : राजापूर तालुक्यातील पर्यटनाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन त्यासाठी आग्रही असलेल्या प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या संकल्पनेला ‘प्रगत राजापूर संघटना’ आणि त्याअंतर्गत निसर्ग पर्यटनासाठी कार्यरत असलेल्या ‘माय राजापूर’ या सेलने आपल्या सहकार्याची जोड दिली आहे.या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून येत्या नवरात्रोत्सवात १३ ते २१ आॅक्टोबर या कालावधीत राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध ‘नवदुर्गा दर्शन सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनाच्या व्यावसायिक दृष्टीने पिछाडीवर असलेल्या राजापूर तालुक्याला जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर आणून येथील धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाची ओळख व्हावी याचा प्रारंभ म्हणून ‘नवदुर्गा दर्शन सोहळ्या’चा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रत्नागिरी, राजापूर आणि आडिवरे अशा तीन ठिकाणांहून या सहलीच्या बसेस सुटणार आहेत. श्री महाकाली - आडिवरे, श्री आर्यादुर्गा - कशेळी, श्री जाकादेवी - कशेळी, श्री कालिकादेवी - वेत्ये, श्री नवलादेवी - नाटे, श्री भरतदुर्गादेवी - होळी, श्री भगवती देवी - माडबन, श्री मुहुर्तादेवी - मिठगवाणे आणि श्री कात्रादेवी - सागवे अशा नऊ देवींचे दर्शन या सहलीतून घेता येणार आहे. कशेळी ते कात्रादेवी या सागरी महामार्गावरून सागर दर्शनही करता येणार आहे. वीस महिला भाविकांच्या एका सहलीत लकी ड्रॉ पध्दतीने एका महिलेला देवीची मानाची साडी भेट देण्यात येणार आहे.प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मूळ संकल्पनेला आमदार राजन साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे, माजी आमदार गणपत कदम यांचे सहकार्य लाभले आहे. प्रगत राजापूर संघटनेचे अ‍ॅड. शशिकांत सुतार, महेश शिवलकर, उल्हास खडपे, संजय मांडवकर, धनंजय मराठे, अरविंद पारकर तसेच रत्नागिरीतील सुधीर रिसबूड यांनी हा उपक्रम आखला असून, माय राजापूरचे जगदीश पवार आणि प्रदीप कोळेकर यांनी संकल्पना विस्तार केला आहे. या सहलींत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी रत्नागिरी येथे पॉश ट्रॅव्हल्स, आडिवरे येथे गणेश रानडे तसेच राजापूर येथे उल्हास खडपे व संजय मांडवकर यांच्याशी संपर्क साधावा व नवदुर्गा दर्शनाचा लाभ घ्यावा. (प्रतिनिधी)पर्यटनाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न.राजापूर तालुक्यातील नवदुर्गांचे दर्शन देण्याची योजना.राजापूर पर्यटनाच्या व्यावसायिक दृष्टीने पिछाडीवर.वीस महिला भाविकांना देवीच्या मानाच्या साडीची भेट़