वागदे उपसरपंचपदी रुपेश आमडोसकर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:15 IST2020-09-15T14:14:25+5:302020-09-15T14:15:15+5:30
वागदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपेश आमडोसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संतोष गावडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली आहे.

वागदे उपसरपंचपदी रुपेश आमडोसकर यांची निवड
कणकवली : वागदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपेश आमडोसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संतोष गावडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली आहे.
वागदे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य हे शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचे असून ग्रामपंचायतवर शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. वागदे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये रुपेश आमडोसकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच पूजा घाडीगावकर, माजी उपसरपंच संतोष गावडे, तंटामुक्त अध्यक्ष दिलीप घाडीगावकर, गाव पॅनलचे अध्यक्ष रवी गावडे, ग्रामपंचायत सदस्य तथा युवा सेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, सदस्य सूर्यकांत आर्डेकर, अनंत सराफ, राजाराम ताटे, सुनील गोसावी, विक्रांत सरंगले, मधुकर घाडीगावकर, गणपत घाडीगावकर, शिरीष घाडीगावकर, शशी घाडीगावकर, अनंत गावडे, शरद गावडे, सुहास गावडे, दत्ताराम गावडे, शरद सरंगले, नागेश आमडोसकर आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक ॠतुराज कदम यांनी काम पाहिले.
रुपेश आमडोसकर हे वागदे ग्रामपंचायतवर २००७ ते २०१२ या कालावधीत सदस्य होते. त्यावेळी ग्रामपाणीपुरवठा स्वच्छता समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गाव पॅनलमधून वॉर्ड क्रमांक १ डंगळवाडी, टेंबवाडी, बौद्धवाडी या प्रभागातून ते बिनविरोध निवडून आले होते. सध्या ते शिवसेनेचे कळसुली जिल्हापरिषद मतदारसंघाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.