शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

तालमय वाद्य मैफिलीत कणकवलीकर रसिक दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 5:26 PM

कणकवली येथील गंधर्व परिवाराच्यावतीने अशिये मठ येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व मासिक संगीत सभेचे दहावे पुष्प रविवारी ' वाद्य मिलाफ' या विविध वाद्यांच्या एकत्रित वादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंफण्यात आले. या तालमय वाद्य मिलाफात रसिक अगदी दंग झाले होते.

ठळक मुद्देअशिये मठ येथे कार्यक्रम, गंधर्व परिवाराचे आयोजनपांचाळ यांच्या सोबत त्यांच्या शिष्यानी वेगवेगळ्या ताल वाद्यांचे एकत्रित वादन तबला, पखवाज, ढोलकी, कख्वॉन या सगळ्या वाद्यांच्या वादनाचा अनोखा कार्यक्रम

सुधीर राणेकणकवली, दि. २३ : येथील गंधर्व परिवाराच्यावतीने अशिये मठ येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व मासिक संगीत सभेचे दहावे पुष्प रविवारी ' वाद्य मिलाफ' या विविध वाद्यांच्या एकत्रित वादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंफण्यात आले. या तालमय वाद्य मिलाफात रसिक अगदी दंग झाले होते.प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येणारी गंधर्व मासिक शास्त्रीय संगीत सभा चोखंदळ रसिकांसाठी एक महापर्वणीच ठरत आहे. अगदी अल्पावधीतच या गंधर्व मासिक संगीत सभेने नावलौकिक मिळविला आहे. आतापर्यन्त अनेक प्रतिथयश कलाकारानी या संगीत सभेत हजेरी लावून आपली कला रसिकांसमोर सादर केली आहे. त्यांना रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. बुजुर्ग कलाकारानी केलेल्या मार्गदर्शनामुळे नवोदित कलाकाराना आपली कला जोपसताना एक दिशा मिळाली आहे.अशिये मठ येथे झालेल्या वाद्य मिलाफ या कार्यक्रमात प्रसिध्द तबला वादक रक्षानंद पांचाळ यांनी तबला एकल वादन केले. त्यात देव स्तुतीपरन, पेशकार, कायदे, रेले, गत, चक्रधार आदी वादन प्रकार त्यानी सादर केले आणि रसिकांची वाहवा मिळविली. रक्षानंद पांचाळ यांना निनाद जोशी यांनी हार्मोनियमवर साथ केली.अलीकडेच नावारुपाला येणारे रक्षानंद पांचाळ यांचे तबला वादनाचे प्राथमिक शिक्षण बाबी अन्सुरकर व सूर्या शेट्ये यांच्याकडे झाले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण गोवा, पणजी येथील संगीत महाविद्यालयात उल्हास वेलंगीकर व पं. प्रभाकर च्यारी यांच्याकडे झाले. सध्या मुंबई येथे पं. मोहन बळवल्ली यांच्याकडे ते पुढील शिक्षण घेत आहेत. तसेच आपल्याला अवगत असलेल्या कलेचे मार्गदर्शन अनेकांना करीत आहेत.तबला एकल वादनानंतर रक्षानंद पांचाळ यांच्या सोबत त्यांच्या शिष्यानी वेगवेगळ्या ताल वाद्यांचे एकत्रित वादन केले. वाद्य मिलाफ या कार्यक्रमामध्ये तबला, पखवाज, ढोलकी, कख्वॉन या सगळ्या वाद्यांच्या वादनाचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी गणेश परन, दत्तगुरु स्तुती परन तसेच प्रत्येक वादकाने सोलो सादर केला. त्यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले.या वाद्य मिलाफ कार्यक्रमात पखवाज रक्षानंद पांचाळ, ढोलकी प्रफुल्ल शिंदे , तबला प्रतीक भगत, तर कख्वॉन वादन तन्मय चव्हाण यांनी केले. कख्वॉन हे एक स्पॅनिश वाद्य आहे. ते बऱ्याच रशियन कार्यक्रमात वापरले जाते. साधारणत: 'ड्रम' सारखा आवाज काढणाऱ्या लाकड़ी खोक्यात तारा बसविलेल्या असतात. या वाद्यातून सुमधुर असे बोल उमटतात. त्याचा आस्वाद प्रथमच कणकवलीतील रसिकाना घेता आला. त्यामुळे अनेक रसिकानी समाधान व्यक्त केले.कणकवली तालुक्यातील आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे वाद्य मिलाफ कार्यक्रमात विविध वाद्यांचे एकत्रित वादन करण्यात आले.

टॅग्स :konkanकोकणmusicसंगीत