कुडाळ सायकल क्लबच्या सायकल मॅरेथॉनला प्रतिसाद, ३२0 स्पर्धक सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:31 IST2020-02-11T13:28:28+5:302020-02-11T13:31:48+5:30
इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२० ही नियोजित सायकल स्पर्धा मोठ्या दिमाखात रविवारी पार पडली. ३२० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. ही स्पर्धा पॅडल्स अँड व्हिल्स आॅफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने आयोजित केली होती. सायकल सर्वांसाठी सर्वांच्या आरोग्यासाठी ही टॅगलाईन घेऊन आयोजित केलेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कुडाळ सायकल क्लबच्या सायकल मॅरेथॉनला प्रतिसाद, ३२0 स्पर्धक सहभागी
कुडाळ : इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२० ही नियोजित सायकल स्पर्धा मोठ्या दिमाखात रविवारी पार पडली. ३२० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. ही स्पर्धा पॅडल्स अँड व्हिल्स आॅफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने आयोजित केली होती. सायकल सर्वांसाठी सर्वांच्या आरोग्यासाठी ही टॅगलाईन घेऊन आयोजित केलेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी राजीव पवार यांच्यासह प्रसाद परब, अरविंद शिरसाट, राजन नाईक, महेंद्र बांदेकर, सदा अणावकर, रणजित देसाई, केदार सामंत, प्रणय तेली, नगराध्यक्ष ओंकार तेली, डॉ. सुबोधन कशाळीकर, पुष्कर कशाळीकर, डॉ. चुबे, डॉ. केसरे, संजय भोगटे उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ सायकल क्लबचे डॉ. रावराणे यांनी केले तर स्पर्धेची सुरुवात कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी ध्वज फडकावून केले. स्पर्धेचे निवेदन प्रणय तेली यांनी केले. या स्पर्धेत सुमारे ३२० स्पर्धकांनी भाग घेऊन ही स्पर्धा रोमांचक व यशस्वी केली.
स्पर्धेची नियोजनाची जबाबदारी गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे व अमोल शिंदे यांनी स्वीकारली. तर प्रत्यक्ष मार्गावरची जबाबदारी क्लबचे सर्वेसर्वा रुपेश तेली, निलेश आळवे, अजिंक्य जामसंडेकर, राजीव पवार, प्रसाद परब केदार भाट, बाबा पोरे, अमित वळंजू यांनी अत्यंत समर्थपणे पेलली
रजिस्ट्रेशनचे आॅनलाईन आणि आॅफलाईनचे काम रुपेश तेली यांनी तर टी-शर्टस् टॅग मेडलचे काम शिवप्रसाद राणे व स्निग्धा बांबुळकर यांनी पाहिले. स्पर्धेच्या नियोजनासाठी एसआरएम कॉलेजच्या एनसीसी विभागाने आपले एनसीसीचे १६ कॅडेट्स देऊन फारच मोलाची मदत केली.
स्वयंसेवक म्हणून सचिन सावंत, पप्पू तवटे, विवेक मांडकुलकर यांनी २५ किलोमीटरचा महत्त्वाचा टप्पा अत्यंत काळजीपूर्वक हाताळला. स्पर्धा तीन टप्प्यात विभागली गेली होती. २५ किलोमीटर, ५० किलोमीटर व १०० किलोमीटर या तिन्ही गटात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.