सावंतवाडी - विकासाच्या दृष्टीने शक्तिपीठ महामार्ग हा महत्त्वाचा आहे त्यामुळे या महामार्गाला विरोध करणाऱ्यांना योग्य त्या भाषेत उत्तर द्या असा इशारा खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान अडाळी एमआयडीसीमध्ये पाचशेहून अधिक उद्योग आणण्यासाठी जिंदाल आणि अंबानी या अदांनी सोबत माझी चर्चा सुरू आहे लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल असे ही राणे यांनी स्पष्ट केले राणे हे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असून त्यांनी सावंतवाडीत भाजप कार्यालयाला भेट दिली जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगरसेवक मनोज नाईक, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर,माजी शहराध्यक्ष अजय गोदावले, प्रमोद कामत शेखर गावकर गुरु मठकर. मोहिनी मडगावकर परिमल नाईक रवी मडगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राणे यांना शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे याबाबत विचारले असता त्यांनी कठोर शब्दात उत्तर दिले ते म्हणाले या ठिकाणी विकास व्हायला पाहीजे तर शक्तीपीठ महामार्ग होणे गरजेचे आहे त्यामुळे नाहक विरोधासाठी विरोध करणाऱ्या लोकांना त्याच भाषेत उत्तर द्या ज्यांना कोण विचारत नाही ते या महामार्गाला विरोध करत आहे. जंगले आम्ही राखली असे म्हणणाऱ्यांना नेमके जंगले राखण्यासाठी काय केले असा उलट सवाल त्यांनी केला.
आडाळी एमआयडीसी मध्ये उद्योग आणण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले त्या ठिकाणी 500 हून अधिक उद्योग येण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत मोठे उद्योग यावेत आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर मी जिंदाल आणि अंबानी या मोठ्या उद्योगजकांशी माझी बोलणी सुरू आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगार यावा आणि त्या माध्यमातून येथील युवकांना रोजगार मिळावा यासाठी माझे प्रयत्न आहे आणि दिलेला शब्द मी पूर्ण करणार आहे.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील 25 अधिक गावे इकोसेन्सिटिव्ह जाहीर करण्यात आली आहेत यावर राणे यांनी या ठिकाणी विकास होणे गरजेचे आहे त्यामुळे इकोसेन्सिटिव्ह सारखा प्रश्न बाजूला ठेवून त्या ठिकाणी रोजगार येण्यासाठी काही करता येऊ शकते का या संदर्भात मी केद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करणार आहे कासार्डे येथील सिलिका मायनिंग सारख्या उद्योगाला ज्यानी आयुष्यभर कमावले तेच आता त्याला विरोध करत आहेत हे योग्य नाही त्यामुळे लवकरच आपण संबंधित पाचही जणांची माहिती उघड करणार आहे असा इशारा त्यांनी दिला