पाच शासकीय वाहनांच्या चाकातील हवा काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 17:31 IST2021-04-15T17:27:09+5:302021-04-15T17:31:55+5:30

Malvan Sindhudurg : मालवण येथील पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहाच्या मागील जागेत उभ्या करून ठेवलेल्या अग्निशमन बंबासह फिरत्या प्रसाधनगृहाच्या चार वाहनांच्या चाकांमधील हवा अज्ञाताने काढल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पालिका प्रशासनाने याची माहिती पोलिसांना कळविली आहे.

Removed air from the wheels of five government vehicles | पाच शासकीय वाहनांच्या चाकातील हवा काढली

पाच शासकीय वाहनांच्या चाकातील हवा काढली

ठळक मुद्देपाच शासकीय वाहनांच्या चाकातील हवा काढली मालवण येथे अज्ञाताकडून कृत्य

मालवण : मालवण येथील पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहाच्या मागील जागेत उभ्या करून ठेवलेल्या अग्निशमन बंबासह फिरत्या प्रसाधनगृहाच्या चार वाहनांच्या चाकांमधील हवा अज्ञाताने काढल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पालिका प्रशासनाने याची माहिती पोलिसांना कळविली आहे.

वरेरकर नाट्यगृहाच्या मागील बाजूस पालिकेच्या अग्निशमन बंबासह स्वच्छ भारत अभियानांतर्गत फिरते सार्वजनिक प्रसाधनगृहाची चार वाहने उभी करून ठेवण्यात आली आहेत.

बुधवारी या पाचही वाहनांच्या चाकातील हवा अज्ञाताने काढल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती पालिका प्रशासनास दिल्यानंतर प्रशासनाने याबाबत पोलीस प्रशासनास कळविले आहे.

Web Title: Removed air from the wheels of five government vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.