शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
6
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
7
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
8
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
9
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
10
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
11
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
12
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
13
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
14
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
15
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
16
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
17
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
18
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
19
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
20
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द

शिक्षक भरती करा अन्यथा खुर्ची खाली करा, शिक्षक दिनी सावंतवाडीत केसरकरांविरोधात युवा सेनेचे बोंबाबोंब आंदोलन

By अनंत खं.जाधव | Published: September 05, 2023 5:04 PM

सावंतवाडी : डी.एड, बी.एड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी एकतर शिक्षक भरती करा, अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी करत आज, मंगळवारी ...

सावंतवाडी : डी.एड, बी.एड बेरोजगारांना न्याय देण्यासाठी एकतर शिक्षक भरती करा, अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी करत आज, मंगळवारी शिक्षक दिनीच ठाकरे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले.यावेळी मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी बसस्थानका जवळच रोखून धरला. त्यामुळे पोलिसांच्या विरोधात आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. केसरकर आंदोलन दडपू शकत नाहीत, अशी टीका यावेळी उपस्थित युवा सेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. युवा सेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यामुळे केसरकर यांच्या निवासस्थानासमोर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता. नेमके आंदोलक कुठून येणार याबाबत सांशकता होती. त्यामुळे पोलीस कुमक आंदोलकांवर विशेष लक्ष ठेवून होती. अशा परिस्थितीत १२ वाजण्याच्या सुमारास येथील गवळी तिठा परिसरातून आंदोलन चालत मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानासमोर येण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना बस स्थानकासमोरून पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिक्षण मंत्री म्हणून केसरकर यांनी एकतर शिक्षक भरती, करावी अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली. केसरकरशिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. त्यांनी फक्त प्रवक्तेगिरी करावी असे युवा सेनेचे मंदार शिरसाट म्हणाले. गेली अनेक महिने मागणी असून सुद्धा बेरोजगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आता त्यांना येणाऱ्या काळात नक्कीच जनता धडा शिकवेल असा इशारा दिला.यावेळी काजल सावंत, मीनाक्षी मेथर, तेजस्वी परब, सोनाली सावंत, पायल आढाव, वैष्णवी पितळे, पंकज शिरसाट, योगेश नाईक, योगेश धुरी, अमित राणे, संदीप महाडेश्वर, मदन राणे, वीरेंद्र चव्हाण, अमित भोगले, राजेश शेटकर, गुणाजी गावडे, आबा सावंत, मायकल डिसोजा, बाळा गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरतीagitationआंदोलन