शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:06 IST

NiteshRane Sindhudurg- राज्यातील महाविकास आघाडी सरकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सूड उगवण्याचे काम करत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेली गुंतवणूक ही ठाणे , पालघर आणि रायगड जिल्ह्यात झालेली आहे . सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकही नव्या उद्योगाची पायाभरणी झालेली नाही .या सरकारने गेल्या वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी एक रुपयाची ही गुंतवणूक केलेली नाही . त्यामुळे या जिल्ह्यातील बेरोजगारांनी करायचे काय ? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी आज येथे उपस्थित केला.

ठळक मुद्दे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राज्य सरकारचे सूड उगवण्याचे काम : नितेश राणे यांची टीकामॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत एक रुपयाची ही गुंतवणूक नाही

कणकवली : राज्यातील महाविकास आघाडी सरकार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सूड उगवण्याचे काम करत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेली गुंतवणूक ही ठाणे , पालघर आणि रायगड जिल्ह्यात झालेली आहे . सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत एकही नव्या उद्योगाची पायाभरणी झालेली नाही .या सरकारने गेल्या वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी एक रुपयाची ही गुंतवणूक केलेली नाही . त्यामुळे या जिल्ह्यातील बेरोजगारांनी करायचे काय ? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी आज येथे उपस्थित केला.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले , सी - वर्ल्ड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतही राज्य शासनाने मौन बाळगले आहे . नवीन उद्योग धंदे नसल्याने दरडोई उत्पन्नामध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची घसरण होऊ लागली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होत आहे . या पर्यटन व्यवसायातून शेकडो रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत . मात्र पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी कोणतेही पाऊल आघाडी सरकारने उचललेले नाही . जलक्रीडा प्रकारांनाही शासनाने परवानगी दिलेली नाही . सर्वच बाजूने कोंडी करण्याचे काम हे सरकार करत आहे . ठाकरे सरकार कोकणचा विकास ठाणे , रायगड, पालघर एवढ्यापुरताच मर्यादित ठेवणार आहे का ? जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, शिवसेनेचे आमदार यांनी याबाबत काय प्रयत्न केले ? असाही सवाल राणे यांनी उपस्थित केला.नितेश राणे म्हणाले, दोडामार्ग, आडाळी या प्रकल्पासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी गुंतवणूक का आणली नाही? मुख्यमंत्री, उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांच्याकडे शिवसेनेच्या नेत्यांनी निधीसाठी आग्रह का धरला नाही ? त्यामुळे जनतेचे हित न पहाणाऱ्या या पालकममंत्र्यांचा व खासदारांचा आम्हाला काय उपयोग आहे. नाणार प्रकल्पाबाबत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकारात्मक होता. आता हा पक्ष राज्यातील सत्तेत आहे. त्यामुळे त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी.चिपी विमानतळ २६ जानेवारीला सुरू होणार असे सांगितले जात आहे. मात्र, तेथे उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांबाबत येथील तरुणांना माहिती का दिली जात नाही? त्यांना प्रशिक्षण का दिले जात नाही. येथील सर्व नोकऱ्या स्थानिकांनाच म्हणजे येथील भूमिपुत्रांना मिळायला हव्यात. बाहेरच्या जिल्ह्यातील मुलांना नोकऱ्या करायला आम्ही देणार नाही. इथल्या तरुणांना नोकऱ्या द्या. त्यांना प्रशिक्षण द्या. आम्ही त्याला सहकार्य करू.नवीन वर्ष जवळ आले तरी वॉटर स्पोर्ट्स सुरू होऊ शकत नाहीत. बार उघडतात पण कोरोनाच्या काळात तरुणांना रोजगार देणारे उद्योग सुरू होऊ शकत नाहीत. हे या राज्य सरकारचे अपयश आहे.असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोंडाला पुसली पाने !मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ४७००० कोटी गुंतवणूक कोकणात झाली आहे. मात्र, त्यापैकी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक टक्काही गुंतवणूक झालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने या दोन्ही जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग