शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : जिल्ह्यात बारा उपकेंद्रांना मंजुरी

By admin | Updated: November 7, 2014 23:41 IST

जिल्हा परिषद : आरोग्यसेवेला प्राधान्य

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या बारा उपकेंद्रांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जिल्हाभरात ३६५ उपकेंद्र आहेत. यातील अनेक उपकेंद्र भाड्याच्या जागेत आहेत, तर काही उपकेंद्रांच्या इमारती नादुरुस्त झाल्याने त्या मोडकळीस आल्या आहेत. उपकेंद्र स्वत:च्या मालकीच्या जागेत व्हावीत, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींकडे जागांची मागणी केली होती. त्याप्रमाणे जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतींकडून उपकेंंद्रांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून, जिल्हा परिषदेकडेही प्रस्ताव आले आहेत.ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करुन दिल्याने त्यांच्या हद्दीमध्ये आरोग्य उपकेंद्र होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना या उपकेंद्रांवर उपचार मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची जिल्हाभरात ३६५ उपकेंद्र आहेत. त्यामधील अनेक उपकेंद्रांच्या जागेचा प्रश्न कायम प्रलंबित राहिला आहे. त्यातून मार्ग काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, या मागणीकडे आता लक्ष देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील १२ उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जिल्हाभरातील उपकेंद्र सक्षम करण्याचा प्रयत्न सर्व स्तरावर झाल्यास त्यातून ग्रामीण भागातील रूग्णसेवा अधिक कार्यक्षम करता येणे शक्य असल्याने आता संबंधित गावातील ग्रामपंचायतींनी उपकेंद्रासाठी जागा दिल्याने या उपकेंद्रांची उभारणी लवकरच करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाने उपकेंद्रांद्वारे ग्रामीण भागातील रूग्णांना अधिकाधिक सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू असून, जागांचे प्रस्ताव आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. इमारतींचा प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबित असून, त्यातील काही उपकेंद्रांच्या नवीन उभारणीमुळे ग्रामीण भागाशी आरोग्याची नाळ जोडण्याचे काम याद्वारे होणार आहे. (शहर वार्ताहर)उपकेंद्रांसाठी जागा मिळालेल्या ग्रामपंचायतीमंडणगडजावळे ग्रामपंचायतगुहागरसुरळ, वडद, पेवे चिपळूणकोळकेवाडी, दहिवली, बामणोली.लांजाइंदवटी, वेरळ, आरगाव.संगमेश्वरपरचुरी. रत्नागिरीशिरगाव. आरोग्य सुविधेला प्राधान्यरुग्णांना आरोग्य सेवा मिळणार.भाड्याच्या जागेचा प्रश्न कायम.जिल्हाभरात ३६५ उपकेंद्र.काही उपकेंद्रांच्या इमारती नादुरूस्त झाल्याने मोडकळीस.नव्या उपकेंद्रामुळे ग्रामीण रूग्णसेवेला गती मिळणार.सक्षम आरोग्य यंत्रणेसाठी उपकेंद्राचा आधार.जिल्हा परिषदेकडे नव्या उपकेंद्रांचे प्रस्ताव.आरोग्य सुविधांवर भर हवा.

जिल्ह्यात बारा उपकेंद्रांना मंजुरी