Sindhudurg: खारेपाटण येथे आढळली दुर्मीळ युरेशियन ग्रिफॉन जातीची गिधाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:00 IST2025-02-07T13:00:14+5:302025-02-07T13:00:42+5:30

खारेपाटण : खारेपाटण येथे दुर्मीळ युरेशियन ग्रिफॉन प्रजातीची स्थलांतरित गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. खारेपाटण मच्छी मार्केट ...

Rare Eurasian Griffon vulture found in Kharepatan Sindhudurg | Sindhudurg: खारेपाटण येथे आढळली दुर्मीळ युरेशियन ग्रिफॉन जातीची गिधाडे

Sindhudurg: खारेपाटण येथे आढळली दुर्मीळ युरेशियन ग्रिफॉन जातीची गिधाडे

खारेपाटण : खारेपाटण येथे दुर्मीळ युरेशियन ग्रिफॉन प्रजातीची स्थलांतरित गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. खारेपाटण मच्छी मार्केट परिसरात ही गिधाडे आढळून आली.

खारेपाटण गावामध्ये सुख नदीच्या काठावर मच्छी मार्केट परिसरात कुक्कुटपालनातील कचरा आणि मासळीचे उरलेले अवयव उघड्यावर टाकले जातात. त्यावेळी घार, बगळे, कावळे घिरट्या घालत असतात. याचदरम्यान उंचावरून आलेल्या या गिधाड्यांच्या मागे कावळे लागले होते. त्यातील दोन गिधाडे इमारतीच्या छतावर उतरल्याचे स्थानिकांनी सांगितले. छायाचित्रकार रमेश जामसांडेकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यातील एका गिधाडाचे छायाचित्र टिपले. त्यानंतर हे गिधाड सुख नदीच्या पलीकडील डोंगराच्या दिशेने उडत गेले.

सोशल मीडियावर या गिधाडाचे फोटो टाकून पक्षी वन्यजीव गिधाड की घार यांची विचारणा करण्यात आली. मुंबईतील पर्यावरण वन्यजीव म्हणून कार्यरत असलेले प्रतिनिधी अभ्यासक अक्षय मांडवकर यांनी फोटोग्राफ मागून घेतले. अखेर युरेशियन ग्रिफॉन गिधाड असल्याचे सांगितले.

कोकणामध्ये गिधाडांची मोठी संख्या रायगड जिल्ह्यात दिसून येते. कोकणातील म्हासाळा आणि श्रीवर्धन तालुक्यात गिधाडांचा कायमस्वरूपी अधिवास आहे. प्रामुख्याने या ठिकाणी पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांचा कायमस्वरूपी अधिवास आहे. शिवाय स्थलांतर करून येणाऱ्या हिमालयीन ग्रिफॉन, युरेशियन ग्रिफॉन आणि काळ्या गिधाडांची नोंद आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, खारेपाटणमध्ये दिसलेले गिधाड हे युरेशियन ग्रिफॉन प्रजातीचे निमवयस्कर आहे.

स्थलांतरादरम्यान आल्याची शक्यता

युरेशियन ग्रिफॉन गिधाडे प्रामुख्याने भारतापर्यंतच्या मध्य प्रदेशांमध्ये क्वचितच आढळतात. खारेपाटणमध्ये आढळलेले गिधाडे ही स्थलांतरादरम्यानच या ठिकाणी आली असावीत, अशी शक्यता वर्तविण्यात आली. पश्चिम घाट कोकण परिसरात रायगड आणि सिंधुदुर्गातील तिलारी प्रदेशात युरेशियन गिधाड स्थलांतर करून येत असल्याच्या तुरळक नोंदी आहेत.

Web Title: Rare Eurasian Griffon vulture found in Kharepatan Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.