घरफोडी करून पळणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 03:09 PM2019-10-07T15:09:04+5:302019-10-07T15:15:03+5:30

पिंगुळी-शेटकरवाडी येथे घरफोडी करून पळणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना तेथील सतर्कग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी सिद्धेश परब (२९, रा. बाव) व अमित दळवी (३०, रा. तळगाव) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Rangheth was arrested by the homeowner | घरफोडी करून पळणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

घरफोडी करून पळणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

Next
ठळक मुद्देघरफोडी करून पळणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडलेपिंगुळी-शेटकरवाडी येथील सतर्क ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

कुडाळ : पिंगुळी-शेटकरवाडी येथे घरफोडी करून पळणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना तेथील सतर्क ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी सिद्धेश परब (२९, रा. बाव) व अमित दळवी (३०, रा. तळगाव) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत निलेश मोर्ये यांनी पोलिसांत माहिती दिली. शनिवारी रात्री मोर्ये व त्यांचा भाऊ यांना दोन अनोळखी व्यक्ती जाताना दिसल्या. या व्यक्ती त्यांच्या वाडीतील नसल्याची खात्री झाल्याने इतक्या रात्री ते कुठे जातात याची विचारपूस त्या दोन्ही व्यक्तींकडे केली. यावेळी त्यांनी कुडाळ येथून दांडिया-गरबा नृत्य बघायला आलो, असे उत्तर दिले.

मात्र, त्यांचे वागणे संशयास्पद वाटू लागल्याने जमलेल्या ग्रामस्थांनी तुमच्या हातात काय आहे? असे विचारले. त्यामुळे भांबावलेल्या त्या दोघांनी ते सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याचे सांगून समोरील घराच्या मागील दरवाजा फोडून चोरी केल्याची कबुली दिली.

शेटकरवाडी येथील सचिन पाटील त्यांच्या घराचा मागील दरवाजा लोखंडी कटावणीने तोडून त्यांनी कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरल्याची माहिती कुडाळ पोलिसांना मोर्ये यांनी दिली. दोन्ही संशयितांना शनिवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. यात नेमका किती मुद्देमाल संशयितांनी लंपास केला याचा पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Rangheth was arrested by the homeowner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.