रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई सायकलिंग, १८ दिवस २०५६ कि.मी. प्रवास केला पूर्ण

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 10, 2023 16:43 IST2023-11-10T16:27:18+5:302023-11-10T16:43:26+5:30

मसुरे (मालवण) : सिंधुदुर्ग मधील मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र रमेश गावडे यांनी जम्मू काटरा ते मुंबई हा २०५६ ...

Ramesh Gawde successful cycling from Jammu to Mumbai | रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई सायकलिंग, १८ दिवस २०५६ कि.मी. प्रवास केला पूर्ण

रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई सायकलिंग, १८ दिवस २०५६ कि.मी. प्रवास केला पूर्ण

मसुरे (मालवण) : सिंधुदुर्ग मधील मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र रमेश गावडे यांनी जम्मू काटरा ते मुंबई हा २०५६ किमी प्रवास १८ दिवस सायकलिंग करत नुकताच पूर्ण केला आहे.

इन्कमटॅक्समध्ये अधिकारी पदावर असलेल्या गावडे यांच्या या अतुलनीय कामगिरीचे कौतुक होत आहे. आरोग्यविषयक व स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी अशा पद्धतीने आपण मोहीम राबवत असल्याचे श्री गावडे यांनी सांगितले.

यापूर्वी गावडे यांनी मु़बंई ते मालवण नंतर मुंबई ते कन्याकुमारी असे यापूर्वी सायकलिंग केले आहे. रनिंग मध्ये हाफ व फुल मॅरेथॉन सुध्दा तेवढ्याच ताकदीने पूर्ण केली आहे. सिंधुदुर्ग मधील सायंकलिंग आणि रनिंग इव्हेंट मध्ये सुद्धा ते भाग घेतात. गावडे यांच्या या कामगिरीबद्दल ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Web Title: Ramesh Gawde successful cycling from Jammu to Mumbai