शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कणकवली तालुक्यात पावसाचा कहर ! कणकवली-आचरा रस्त्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 1:39 PM

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात सलग सातव्या दिवशी पावसाची धुवाधार बरसात सुरू आहे.मंगळवारी दिवसभर जोरदार बरसल्यानंतर बुधवारीही सकाळपासूनच त्यात ...

ठळक मुद्देकणकवली तालुक्यात पावसाचा कहर ! कणकवली-आचरा रस्त्यावर पाणी गडनदी, जानवली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात सलग सातव्या दिवशी पावसाची धुवाधार बरसात सुरू आहे.मंगळवारी दिवसभर जोरदार बरसल्यानंतर बुधवारीही सकाळपासूनच त्यात सातत्य राखले होते. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात तालुक्यात सरासरी १३३ मिलिमीटर पावसाची नोंद येथील तहसील कार्यालयात झाली होती.कणकवली आचरा रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशीही पाणी आले होते. त्यामुळे तो रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. सातरल - कासरल रस्ता , हरकुळ बुद्रुक -शिवडाव बंधारा पाण्याखाली गेला होता. तर कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती.पावसाच्या या कहरामुळे तालुक्यात नदि- नाले ओसंडून वाहू लागले आहेत. कणकवली शहरातील नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने काहि घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे नगरपंचायत कर्मचारी या एकंदर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा या कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग