मास्क न वापरणाऱ्यांवर रेल्वेकडून कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 03:08 PM2021-04-10T15:08:34+5:302021-04-10T15:09:37+5:30

Railway CoronaVirus Sindhudurg : कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक पावले उचलली जात आहेत. कोकण रेल्वेच्या स्थानक परिसरात आणि प्रवासादरम्यान मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Railways take action against those who do not use masks | मास्क न वापरणाऱ्यांवर रेल्वेकडून कारवाई सुरू

मास्क न वापरणाऱ्यांवर रेल्वेकडून कारवाई सुरू

Next
ठळक मुद्देमास्क न वापरणाऱ्यांवर रेल्वेकडून कारवाई सुरूप्रति व्यक्ती ५०० रुपये दंड

कणकवली : कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक पावले उचलली जात आहेत. कोकण रेल्वेच्या स्थानक परिसरात आणि प्रवासादरम्यान मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

कोविड रोखण्यासाठी प्रशासन सर्व ती खबरदारी घेत आहे. कोकण रेल्वेनेही निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रेल्वेमधून प्रवास करताना मास्क न वापरणाऱ्या मंडळीवर कारवाई सुरू झाली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये तपासणी केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्या मंडळींकडून प्रति व्यक्ती ५०० रुपये दंड घेतला जात आहे.

रेल्वेप्रमाणे स्थानक परिसरातही मास्क न वापरणाऱ्या मंडळीविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोकण रेल्वेत सध्या आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. तसेच मास्क व इतर शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

Web Title: Railways take action against those who do not use masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.