शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खोटले धनगरवाडी माळरानावर जुगारावर धाड, १५ जणांवर गुन्हा दाखल; रोख रक्कमेसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 1, 2025 18:51 IST

संदीप बोडवे मालवण : खोटले धनगरवाडी माळरानावर सुरु असलेल्या जुगाराच्या पटावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मध्यरात्री धाड ...

संदीप बोडवेमालवण : खोटले धनगरवाडी माळरानावर सुरु असलेल्या जुगाराच्या पटावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईत चारचाकी (४), मोबाइल, दुचाकी (१) यासह १ लाख ४३ हजार रोख रक्कम व लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर जुगार खेळण्यासाठी आलेल्या जिल्हाभरातील १५ संशयित आरोपींच्या विरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरु आहे, अशी माहिती मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व मालवण पोलिसांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गचे आशिष यशवंत जामदार यांनी दिली आहे.१ एप्रिल रोजी रात्री १.१० वाजता खोटले धनगरवाडी, मालवण येथे अंदर बाहर पट जुगारावर पैसे लावून काहीजण जुगार खेळ खेळत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी याठिकाणी धाड टाकली. सुमारे ३७ लाख ५८ हजार ६९० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम १ लाख ४३ हजार ३९० तसेच मोबाइल फोन, चारचाकी कार ४, दुचाकी १ जप्त करण्यात आले.जुगार खेळत असल्याप्रकरणी १५ संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात गुरुनाथ साबाजी नाईक (२२, रा. आरोस, गिरोबा वाडी सावंतवाडी), रामचंद्र सदाशिव गुरसाळे (६३, रा. पटकी देवी जवळ कणकवली), महेश सुंदर आंबेरकर (४०, कणकवली), संजय श्रीधर साळगावकर (५०, रा. कट्टा गुरमवाडी मालवण), गणेश सोमा पालव (३७,रा. मसुरे मालवण), बाळकृष्ण पांडुरंग वर्धम (६९,रा. सातोसे तालुका सावंतवाडी), संतोष बाळकृष्ण कुडतरकर (५३,रा. माणगाव कुडाळ) , सुरेश श्रीधर कवटणकर (५२,रा. कवठणी सावंतवाडी), रोहित राजेंद्र गराटे (२९, रा. कासर्डे कणकवली), भीमसेन तुळजाराम इंगळे (४१, रा. कलमठ कणकवली), प्रशांत प्रकाश चव्हाण (४०, रा. मसुरे मालवण), तुषार नंदकुमार मसुरकर (३४, रा. कलमठ कणकवली), अक्षय नारायण चव्हाण (३५,रा. कुमामे मालवण), संदीप गोळवणकर (रा. कांबळे गल्ली कणकवली), तुकाराम खरात (रा. कलमठ कणकवली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस