कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा , ४ जणांसह २० हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:41 IST2020-09-23T16:40:37+5:302020-09-23T16:41:45+5:30
कणकवली शहरातील रेल्वे स्टेशन नजीक ३ पत्ती जुगारावर पोलिसांनी छापा टाकत २० हजार ८२० रुपयांच्या रोख रक्कमेसह मोबाईल फोन जप्त केले. जुगार प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा , ४ जणांसह २० हजारांचा मुद्देमाल जप्त
कणकवली : शहरातील रेल्वे स्टेशन नजीक ३ पत्ती जुगारावर पोलिसांनी छापा टाकत २० हजार ८२० रुपयांच्या रोख रक्कमेसह मोबाईल फोन जप्त केले. जुगार प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
कणकवलीत सोमवारी पोलिसांना जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कणकवली रेल्वे स्टेशननजीक ३ पानी जुगार सुरु होता. जुगारावर छापा टाकल्यानंतर ४ जण जुगार खेळताना रंगेहात सापडले.
यावेळी संशयित आरोपी प्रकाश शिंदे उर्फ सावकार (रा. कणकवली), नारायण चंद्रकांत आंगणे (रा. गोठणे, ता. मालवण), यश उध्दव घाडीगांवकर (रा. बांधकरवाडी, कणकवली) , सूरज यशवंत सुर्वे (रा. परबवाडी, कणकवली) या चौघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, महिला पोलीस हवालदार ममता जाधव, कॉन्स्टेबल किरण मेथे, चालक कॉन्स्टेबल माने यांच्या पथकाने केली.
याबाबत पोलीस नाईक किरण कृष्णात मेथे यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार ममता जाधव करत आहेत.