शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पर्यटकाला हात-पाय बांधून बेदम मारहाण, कुडाळातील घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:07 IST

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने बांधून हॉटेल व्यावसायिकाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ...

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने बांधून हॉटेल व्यावसायिकाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कुडाळपोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकारांना दिली. रुपेश बबन सकपाळ (वय ३३, रा. कात्रज, पुणे) असे पर्यटकाचे नाव आहे.ही घटना गुरुवारी सकाळी ६ ते ६:३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंटवर घडली. याप्रकरणी तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (५७), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (१८), परवीन शराफत शेख (४२), साजमीन शराफत शेख (१९), तलाह करामत शेख (२६, सर्व रा. झाराप खान मोहल्ला, ता. कुडाळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पुणे कात्रज येथील पर्यटक गोव्याला जात होते. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी हे पर्यटक थांबले. चहा घेताना एका कपात माशी पडली. त्यामुळे त्यांनी हा चहा बदलून द्या, असे सांगितले. त्यावरून हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली व त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. हॉटेल व्यावसायिकांसह अन्य काही जणांनी या पर्यटकाचे हातपाय बांधून त्याला रस्त्यावर झोपविले आणि मारहाण केली.पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिस ठाण्याची टीम घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. त्यानंतर पोलिसांच्यावतीने या घटनेविरोधात तक्रार देण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPuneपुणेkudal-acकुडाळtourismपर्यटनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस