शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयांना सोयी देऊ

By admin | Updated: January 5, 2015 00:41 IST

दीपक सावंत : कुडाळवासीयांना आश्वासन, ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचा आढावा

कुडाळ : कुडाळ ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सोयीसुविधा येत्या तीन महिन्यांत देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी कुडाळवासीयांना दिले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी कुडाळ गामीण रुग्णालयाची पाहणी करून येथील ग्रामस्थांच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले. त्यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्य संचालक सतीश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक आर. डी. माने, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, महिला शिवसेना उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, बंड्या सावंत, संजय परब, शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर असून महामार्ग व रेल्वेस्थानक या ठिकाणी आहे. अपघातांचे तसेच येथील येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असते. मात्र, या ठिकाणी योग्य प्रमाणात सेवा-सुविधा मिळत नाहीत. वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्याने गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा पणजी-गोवा येथे पाठविण्यात येते. प्रवासादरम्यान रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे योग्य सेवा-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे म्हणाले की, या रुग्णालयातील सोयी-सुविधा जनतेला चांगल्या प्रमाणात देण्यात याव्यात याकरिता वेळोवेळी निवेदने दिली. परंतु प्रशासनाने दुर्लक्षच केले, असे सांगितले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, जिल्ह्यातील, विशेष करून कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या येथील आमदार वैभव नाईक यांनी आमच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. या समस्या निवारण्यासंदर्भात कारवाई सुरू झाली असून येथील मूलभूत सोयीसुविधा येत्या तीन महिन्यांत सुरळीत केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)आमदारांनी लक्ष वेधलेरुग्णालयाच्या नवीन इमारती बांधून ठेकेदारांना पैसे देण्यापेक्षा याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, तसेच वीज, पाणी, येथील रस्ता आणि इतर सुविधा द्याव्यात, अशी मागणी प्रसाद शिरसाट यांनी केली.याठिकाणी असलेल्या इमारतीमध्ये सध्या ३० खाटाच असल्याने अनेक रुग्णांना दुसरीकडे जावे लागत आहे. मात्र, याठिकाणी अजून ६० खाटा बसू शकतात. त्यामुळे आणखी चांगली सेवा देता येईल, याकडे आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले. चांगले डॉक्टर उपलब्ध करुन देण्याची मागणीदवाखान्यासाठी इमारती बांधून ठेकेदाराला पैसे देण्यापेक्षा या ठिकाणी चांगले डॉक्टर उपलब्ध करून चांगली सेवा द्यावी, अशी मागणी कुडाळ सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली.